Kolhapur News कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. हिरण्यकेशी नदीत (Hiranyakeshi River) बुडून तिघांचा मृत्यू झाला असून हे तिघेही एकाच कुटुंबातील होते. धुणं धुण्यासाठी कुटुंबातील सदस्य नदीकाठी आले असता ही दुर्दैवी घटना घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील (Ajra Taluka) हिरण्यकेशी नदीत धुणं धुण्यासाठी कटाळे कुटुंबातील सदस्य नदीकाठी आले होते. यावेळी तिघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी नदीकाठी धाव घेतली. काहींनी गजरगाव नजीकच्या बंधाऱ्यात तिघांना शोधण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. 


मृतांची नावे पुढीलप्रमाणे 


उदय बचाराम कटाळे


अरुण बचाराम कटाळे


प्रकाश अरुण कटाळे, अशी मृतांची नावे आहेत. 


पाझर तलावात बुडून तिघांचा मृत्यू 


दरम्यान, करेकुंडी येथील पाझर तलावात पोहायला गेलेल्या शाळकरी मुलींना वाचवायला गेलेल्या सेवानिवृत्त जवानासह दोन मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली आहे. भर उन्हात करेकुंडी येथील पाझर तलावात शाळकरी मुली पोहायला गेल्या होत्या. दमछाक झाल्याने त्या पाण्यात बुडू लागल्या. यावेळी सेवानिवृत्त विजय विठोबा शिनोळकर हे त्यांना वाचवायला गेले. मात्र, त्यात चैतन्या नागोजी गावडे, आणि समृद्धी अजय शिनोळकर या दोन्ही मुलींसह तिघेही तलावात बुडाले. सायंकाळी तलावाच्या काठावर तिघांचे कपडे गावातील एकाला दिसले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तिन्ही मृतदेह ग्रामस्थांनी पाण्याबरोबर काढले.


इतर महत्वाच्या बातम्या 


Ahmednagar News: मोठी बातमी : मांजरीला वाचवताना 6 जण बायोगॅसच्या 200 फूट खोल खड्ड्यात बुडाले, नगर हादरलं


Dombivli : अडीच वर्षाची मुलगी खाडीत बुडाली, वाचवण्यासाठी पाण्यात गेलेले वडीलही बुडाले; डोंबिवलीतील धक्कादायक घटना