Balasaheb Thorat on Satyajeet Tambe: नाशिक (Nashik Padvidhar Election) पदवीधर निवडणुकील काँग्रेसच्या विरोधात जात अपक्ष निवडणूक लढवून जिंकणारे आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्याबद्दल पहिल्यांदाच माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat ) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले आहेत की, ''जे काही झालं आहे, ते फक्त पक्षीय राजकारण आहे. मी माझ्या पक्षश्रेष्ठींना याबद्दल माझं मत कळवलं आहे. सत्यजीत तांबे चांगल्या मतांनी विजयी झाले आहेत.'' याबद्दल थोरात (Balasaheb Thorat ) यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat ) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित शिंदे शाही बाणा या सांस्कृतिक कार्यक्रमात थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील जनतेशी ऑनलाईन संवाद साधला.


Balasaheb Thorat: 'खांद्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे महिनाभर कार्यकर्त्यांपासून लांब राहिलो'  


बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat ) म्हणाले आहेत की, ''नागपूर (Nagpur) अधिवेशनच्या वेळी मी मॉर्निंग वॉकला गेलो. त्यावेळी खड्यात खड्ड्यात पाय अडकून तोल गेला आणि मी पडलो. यामुळे खांद्याला फ्रॅक्चर झाला. यानंतर ब्रीच कँडी रुग्णालयात (breach candy hospital) याची शस्त्रक्रिया झाली. एक महिना हे सर्व जपावं लागलं होतं. अजूनही डॉक्टरांचं म्हणणं आहे की, मी प्रवास करू नये, म्हणून मी येऊ शकलो नाही. एक महिना संगमनेर तालुक्याच्या जनतेपासून दूर राहिलो असा माझ्या जीवनातील कोणताच कालखंड नाही.''   


बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat ) म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीत खूप राजकारण झालं. सत्यजीत (Satyajeet Tambe) खुप चांगल्या मताने विजय झाला, त्याचे अभिनंदन. जे राजकारण झालं ते मला व्यथित करणारं होतं. मी माझ्या भावना काँग्रेसच्या (Congress) पक्षश्रेष्ठींना कळवल्यात आहेत. हे पक्षीय राजकारण, बाहेर बोलू नये मी या मताचा आहे. ते म्हणाले,  मधल्या काळात अशा बातम्या आल्या की आपल्याला पार भारतीय जनता पक्षापर्यंत नेऊन पोहोचवलं होतं. एवढंच नाही तर भाजपच्या (BJP) तिकिटाचे वाटप देखील करून टाकलं. काही लोक गैरसमज पसरवण्याचे काम करत आहेत. त्यांनी अनेक प्रकारच्या चर्चा घडवून आणल्या. आतापर्यंत काँग्रेसच्या विचाराने वाटचाल केली. पुढील वाटचाल त्याच विचाराने राहणार याची ग्वाही देतोय, असं ते म्हणाले आहेत.


इतर महत्वाची बातमी: 


Marathi Sahitya Sammelan : ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतन कायदा सक्‍तीचा करावा, मराठी साहित्य संमेलनातून मागणी, 10 ठराव मंजूर