Prakash Ambedkar on Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला (vanchit bahujan aghadi) घ्यायचं नाही, असा त्यांचा निर्णय झाला आहे. कारण अजित पवार (Ajit Pawar) यांनी असं म्हटलं आहे की, 'माझा व्यक्तिगत विरोध नाही, पक्षाचा विरोध आहे.' यामुळे वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत स्थान मिळणे अवघड असल्याचे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. 


नाशिकमध्ये (Nashik) आज स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. नाशिकच्या पंचवटी परिसरातील जेजुरकर मळ्यात या अधिवेशनाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी माध्यमांची संवाद साधत वंचित आघाडी अद्यापही महाविकास आघाडीत नसल्याचे स्पष्ट केले. ते यावेळी म्हणाले, की शिवसेनेची युती झाली आहे मात्र राष्ट्रवादी व काँग्रेस यांचा अद्याप निर्णय झालेला नाही याबाबत अजित पवार यांनी देखील म्हटले आहे की माझा व्यक्तिगत विरोध नाही मात्र पक्षाचा विरोध आहे. म्हणजे राष्ट्रवादीचा आम्हाला विरोध आहे, हे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 


तर कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीबद्दल प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आमची शिवसेनेशी युती आहे. आम्ही शिवसेनेला विनंती केली होती, की त्यांनी दोन्ही जागा लढवाव्या. याचं कारण कसबा मतदारसंघात काँग्रेस हारलेली आहे. तसेच 2019 मध्ये राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केला नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आता शिवसेना काय भूमिका घेते हे बघणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सेनेची भूमिका आल्यानंतर  पक्ष भुमिका घेईल, प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. पण कसबा चिंचवड निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार असल्यास आमचा पाठिंबा पूर्णपणे असेल स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले. 


दरम्यान कसबा चिंचवड निवडणुकीत बिनविरोधसाठी मुख्यमंत्र्यांचा फोन आल्याच्या घटनेवर ते म्हणाले की, लोकशाहीत बिनविरोध अशी संकल्पना नाही. आमदार निधन झाल्यास त्यांच्याबद्दल सहानुभूती असते, यात दुमत नाही. परंतु ही प्रथा पडू नये की एखादा आमदार निधन झाल्यास त्याच्या घरच्यांना निवडून द्यावे. ही संकल्पना लोकशाहीत बसत नाही, कार्यकर्ता लोकशाहीत बसतो. नवीन कार्यकर्त्याला निवडून द्यावे या मताचा मी आहे. उद्या माझे निधन झाल्यास, माझ्या बायकोला निवडून द्यावे, या मताचा मी नाही , अशी स्पष्ट भूमिका बिनविरोध निवडणुकीवर त्यांनी मांडली. 


विधानपरिषद निवडणुकीवर ते म्हणाले...


राज्यात पाच ठिकाणी शिक्षक पदवीधर निवडणूक पार पडली. यात भाजपची विदर्भात पीछेहाट झाली, असे म्हणेन..मराठवाड्यात राष्ट्रवादी पुढे आली, कोकणात बीजेपी पुढे आली. हा ट्रेंड आहे, असं मी मानतो 


वंचितला राष्ट्रवादीचा विरोध


शिवसेना वंचित युती झाली असली तरीही अद्याप महाविकास आघाडीत वंचित स्थान मिळणार का? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं नाही, असा त्यांचा निर्णय झाला आहे. यावर अजित पवार यांनी असं म्हटलं आहे की, माझा व्यक्तिगत विरोध नाही, पक्षाचा विरोध आहे. यावरून राष्ट्रवादीचा आम्हाला विरोध आहे, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.