Bacchu Kadu on Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत शिर्डीत आज भाजपचे अधिवेशन पार पडले. याअधिवेशनात बोलताना अमित शाह यांनी भाजप सर्व निवडणुका जिंकणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्त्व्यावर प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपला सर्व निवडणुका जिंकण्यासाठी ईव्हीएमची कृपा राहणार आहे. ईव्हीएमच्या कृपेशिवाय भाजपकडे आहे तरी काय? असा सवाल करत बच्चू कडू यांनी भाजपला टोला लगावलाय. 

Continues below advertisement

रवी राणा आणि आमच्यात कायमचं वैर नाही

रवी राणा यांच्याबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले की, मनभेद आणि मतभेद यात फरक आहे. मनभेद होण्यासाठी थोडा वेळ लागेल. चहा पिण्याइतकं वातावरण आधी तयार करु नंतर चहा घेऊ असे कडू म्हणाले. रवी राणा आणि आमच्यात कायमचं वैर नाही किंवा खानदानी दुश्मनी नाही. याआधी जो प्रकार झाला आहे, तो मनभेदाचा होता. तो आधी चांगला करण्याचा प्रयत्न करु असेही कडू म्हणाले. जिल्ह्याच्या विकासात आम्ही विरोध करत नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी मी कधी आडवा आलो नाही. अमरावती मंत्रिपदाबाबत विषय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे असे कडू म्हणाले.

फडणवीसांच्या मनात रवी राणांना मंत्रिपदापेक्षा काही मोठं देण्याचा विचार असेल

रवी राणा यांना कॉल आला आणि त्यांना पद देणं यात जमीन आसमानचा फरक असल्याचे कडू म्हणाले. फडणवीसांच्या मनात मंत्रिपदापेक्षा काही मोठे देण्याचा विचार असेल. त्यामुळं मंत्रीपद देण्याचा थांबवलं असेल असा टोला देखील कडू यांनी लगावला.  

Continues below advertisement

नेमकं काय म्हणाले होते रवी राणा?

रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा अमरावतीत आज मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला संबोधित करताना रवी राणा  यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. अमरावती जिल्ह्यात गटागटात गाठा बांधून ठेवल्या होत्या. त्या गाठा नष्ट करण्याचं काम जनतेने केलं आहे. जनतेने त्यांना धडा शिकवला. त्यांना माझं सांगणं आहे की, रवी राणा कुठल्या नेत्याच्या विरोधात नाही. या जिल्ह्यातील कोणता नेता रवी राणाचा दुश्मन नाही. जिल्ह्यातील कोणत्याही आमदारांनी मला चहा प्यायला बोलावलं तर मी त्यांच्या घरी जायला तयार असल्याचे रवी राणा म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

शरद पवार देशात मंत्री, राज्यात मुख्यमंत्री होते पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू शकले नाहीत, अमित शाह यांची टीका