अमरावती : राज्याच्या मंत्रिमंडळात (Maharashtra Cabinet Expansion) स्थान न मिळाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय आणि युवा स्वाभीमान पक्षाचे आमदार रवी राणा (Ravi Rana) हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. आता रवी रणा यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर मंत्रिपद न मिळाल्याने खंत व्यक्त केली आहे. आमदार बनून बनून मी त्रासलो आहे, मला देखील वाटतं मी मंत्री झाले पाहिजे, अशा भावना त्यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.  


विधानसभा निवडणुकीत महायुतीला अमरावती जिल्ह्यात भरघोस यश मिळाल्याचे दिसून आले. या यशात आमदार रवी राणा यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे मागील वेळेस हुकलेले मंत्रीपद किमान यंदा तरी आपल्याला मिळेल, या आशेवर बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा होते. मात्र, मंत्रिपद न मिळाल्याने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सहभागी न होता थेट अमरावतीला दाखल झाले होते. तर रवी राणा यांच्या पत्नी भाजप नेत्या नवनीत राणा यांनी जिंदगी हे लढाई जारी हे..., अशा आशयाचा व्हिडिओ शेअर केला होता. यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात होते.   तसेच रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. 


नेमकं काय म्हणाले रवी राणा? 


यानंतर आज अमरावतीत आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा वर्धापन दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात रवी राणा यांनी मंत्रिपद न मिळाल्याने आपल्या कार्यकर्त्यांसमोर खंत व्यक्त केली. रवी राणा म्हणाले की, आमदार बनून बनून मी त्रासलो आहे, मला देखील वाटतं, मी मंत्री झाले पाहिजे. ज्या दिवशी मी मंत्री बनेल, त्यादिवशी मंत्री कसा असतो? हे तुम्हाला मी दाखवून देईल. भविष्यात मला चांगली संधी मिळेल, अशी मला आशा आहे. आठ दिवस आधी मला सांगितलं होतं की, तुम्हाला कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे. मात्र, मला वेळेवर थांबवण्यात आलं. या जिल्ह्याची विकासाची दहापट भरपाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करून घेणार आहे. मंत्रीपद मिळाले नाही म्हणून कार्यकर्त्यांनी नाराज होऊ नये. कोणतेही काम असलं तरी आपण मंत्र्यापेक्षा कमी नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


BJP Maha Adhiveshan : राज्याचे जाणते राजे, अनेक भावी मुख्यमंत्र्यांना घरी बसवलं; भाजपच्या महाअधिवेशनात महाविकास आघाडीवर घणाघात