नागपूर : प्रहार जनशक्ती पक्षाचे (Prahar Janshakti Party) सर्वेसर्वा आणि अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट घेतली. नागपूर येथील गडकरींच्या निवासस्थानी ही भेट झाली. दरम्यान या भेटीसंदर्भात स्व:ता बच्चू कडू यांनी स्पष्टोक्ती देत या भेटी मागचे कारण सांगीतले आहे. नितीन गडकरी यांच्याकडे असलेल्या विभागासंदर्भात मी त्यांची भेट घेतली. यात शकुंतला ब्रॉड गेज रेल्वे झाली पाहिजे, बंद पडलेल्या मिल संदर्भात मार्ग काढावा, कामगारांना पगार नाही, राज्यात सरकार भाजपचे आहे, त्यावर तोडगा काढावा. अशी मागणी मी केली असल्याचे बच्चू कडू म्हणाले.
या भेटी वेळी मतदारसंघाचे महत्वाचे विषय होते. त्यासोबतच शकुंतला एक्सप्रेसचे राहिलेले अर्धवट काम, चांदूरबाजार ते परतवाडा रस्ता या सगळ्या विषयासह राजकारणावर चर्चा झाली. तसेच बच्चू कडू नेहमी ॲक्शन मोडमध्ये असतो, पराभवाने खचून जात नाही, बच्चू कडू मानसिकतेने किंवा हिंमतीने पडलेले नाही. तर बच्चू कडू हा आंदोलक म्हणून जास्त आवडत असल्यानं लोकांनी मला पाडलं, असेही ते मिश्किल पणाने म्हणालेत.
अन्यथा येत्या 7 जानेवारीला आंदोलन
नागपुरातील हिवाळी अधिवेशनातील या सगळ्या प्रकरणांमध्ये कर्जमाफीची बाब स्पष्ट करण्यात यावी, नेमकं कुठलं कर्ज माफ करणार आहे. 2012 पासून दोन्ही कर्जमाफीमध्ये ज्यांना लाभ मिळाला नाही, त्यांना नेमकं काय लाभ मिळणार आहे. जानेवारी ते मार्च हे कर्ज वसुलीचे दिवस आहे. मात्र सरकारच्या या घोषणेमुळे कर्ज वसुली थांबली आहे. सगळे कर्ज थकीत जाणार. त्यामुळे पुन्हा नवीन कर्ज शेतकऱ्यांना मिळणार नाही. त्यासंदर्भात सरकारने तातडीने स्पष्टता आणावी. नियमित कर्जदारांसाठी काय करणार आहे, त्याबाबत मुख्यमंत्री यांनी तातडीने स्पष्टता द्यावी. अन्यथा आम्ही सात तारखेला आंदोलन करू. असा इशाराही बच्चू कडू यांनी यावेळी दिला आहे.कर्जमाफी आणि मेंढपाळ लोकांसाठी परप्रांतीय जनावर येतात. त्याचा परिणाम स्थानिक जनावरांना रोगराई पसरून होतो. मेंढपाळ यांच्यासाठी आंदोलन करू. त्या आधी मुख्यमंत्री यांना पत्र देऊ, त्यानंतर पुढची दिशा ठरवू, असेही ते म्हणाले.
हे ही वाचा