Ashok Chavan:  माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आमदारकीसह काँग्रेस  (Congress) सदस्यत्वाचा  राजीनामा दिला आगे. अशोक चव्हाण यांनी नार्वेकरांची भेट घेतल्याची माहिती असून 14  फेब्रुवारी रोजी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांना भाजपकडून (BJP)  राज्यसभेवर उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.  चव्हाणांना राज्यात मंत्रिपद देण्यास भाजप नेत्यांचा विरोध असल्यानं त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 


अशोक चव्हाणांचा  राजीनामा विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्वीकारला आहे. 11 वाजून 24  मिनिटांनी अध्यक्षांकडे चव्हाणांनी राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यास त्यांचं स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे.  काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद आणि धूसफूस असल्याचा दावा बावनकुळेंनी केला आहे. तर  आगे आगे देखिए होता है क्या, असे सूचक वक्तव्य काँग्रेस आमदार अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. 


अशोक चव्हाण यांना राज्यसभा मिळण्याची शक्यता


अशोक चव्हाण यांना राज्यसभा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात अशोक चव्हाणांना मंत्रीपद देण्यासाठी भाजप नेत्यांकडून विरोध आहे.  त्यामुळे त्यांना राज्यसभा दिली जाण्याची दाट शक्यता आहे.  मागच्या आठवड्यातच अशोक चव्हाण यांनी  केंद्रीय मंत्री अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांची भेट घेतली.






15 फेब्रुवारीला पक्षप्रवेश होण्याची शक्यता


 अमित शहा यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. आपला पक्ष प्रवेश केंद्रीय  नेतृत्वाच्या उपस्थितीत व्हावा असे त्यांनी या भेटीत सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  अमित शहा 15 तारखेला महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत याच दरम्यान अशोक चव्हाण भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे.  


अशोक चव्हाण नॉट रिचेबल


वर्षभरापासून अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. स्वतः चव्हाण यांनी याचे अनेकदा खंडण केले. भारतीय जनता पक्षाचे नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनीही अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाविषयी जाहीर वक्तव्य केले होते.. अशोक चव्हाण हे संस्थापक असलेल्या व त्यांच्या गटाची सत्ता असलेल्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या 147 कोटी रुपयांच्या कर्जाला शासनाने थकहमी दिली होती. 


हे ही वाचा :


Ashok Chavan Resign: अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची प्रत माझाच्या हाती, पत्रात नेमकं काय म्हटले?