मुंबई : मुंबई भाजपचा फायरब्रँड चेहरा अशी ओळख असलेले आमदार आशिष शेलार (Ashish Shelar BJP) यांनी एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा (Tondi Pariksha ABP Majha) या कार्यक्रमात हजेरी लावून, अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. लोकसभा निवडणूक, मुंबई उत्तर मध्यची संभाव्य उमेदवारी, विधानसभा निवडणूक, राज ठाकरे, MCA अशा विविध घडामोडींवर आशिष शेलार यांनी भाष्य केलं. यावेळी आशिष शेलार यांना त्यांच्या बदललेल्या पेहरावाबाबत विचारण्यात आलं. 


आशिष शेलार (Ashish Shelar BJP) हे नेहमी जीन्स पँट आणि दोन खिसे असणारा शर्ट घालत होते. मात्र अचानक त्यांनी आपला हा पेहराव का बदलला असा प्रश्न विचारला. त्यावर आशिष शेलार म्हणाले, "मी एकदा अमितभाईंसोबत बसलो होतो. त्यावेळी अमितभाई म्हणाले, जीन्स छोड दो. मी म्हटलं का? तर ते म्हणाले, मै बोल रहा हूँ. मी म्हटलं ठिक है, लेकीन कुछ कारण? ते म्हणाले अच्छे विचार आएंगे. 


जय शाहांच्या कामाचं कौतुक


दरम्यान, यावेळी आशिष शेलार (Ashish Shelar BJP) यांना बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह आणि त्यांच्यावर ठाकरेंकडून होणाऱ्या टीकेबाबतही विचारण्यात आलं. त्यावर आशिष शेलार म्हणाले, "जय शाह यांनी भारतीय क्रिकेट वाढीमध्ये योगदान दिलं आहे. पुरुष IPL प्रमाणे महिला IPL चे आयोजन तसंच महिला क्रिकेटपटूंना पुरुष क्रिकेटपटू इतकंच मानधन असे निर्णय जय शाह यांनी घेतले"


ठाकरेंच्या आरोपांना उत्तर


उद्धव ठाकरे यांनी जय शाह  यांचं क्रिकेटमध्ये योगदान काय, भारतीय टीम त्यांच्यामुळेच वर्ल्डकप हरली असे आरोप केले होते. त्यालाही आशिष शेलार यांनी तोंडी परीक्षेत उत्तरं दिली. ते म्हणाले, "उद्धव ठाकरे यांना अजिबात अभ्यास नाही, वर्ल्डकपच वेळापत्रक कोण ठरवतं, मैदानाची निवड कोण करतं, प्रेक्षकांची क्षमता किती, सुरक्षेची व्यवस्था काय, मैदानाची खेळपट्टी कशी असते, हे सगळं आधीच ठरलेलं असतं, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी बिनबुडाचे आरोप करु नये", असंही आशिष शेलार (Ashish Shelar BJP) यांनी म्हटलं आहे. 






इतर महत्वाच्या बातम्या 


Uttam Jankar on Shahajibapu Patil : सुपारी फुटली मुंबईत, हळद लागली गुवाहाटीत, आता सांगोलाकर मुहूर्त लावतील, उत्तम जानकरांचा शहाजीबापूंवर हल्ला