Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी केंद्रीय वखार महामंडळ, गोदाम अंबड येथे पार पडत आहे. पहिल्या फेरीच्या मतमोजणीत शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे (Kishor Darade) आघाडीवर आहेत. तर विवेक कोल्हे दुसऱ्या स्थानी आणि  महाविकास आघडीचे संदिप गुळवे हे तिसऱ्या क्रमांकावर 


नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 21 उमेदवार रिंगणात आहे. मात्र महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे (Kishor Darade) तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar), महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे (Sandeep Gulve), आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्यात प्रामुख्याने चौरंगी लढत होत आहे. 


महायुतीचे उमेदवार किशोर दराडे आघाडीवर 


नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत महायुतीचे उमेदवार किशोर दराडे आघाडीवर आहेत. किशोर दराडे यांना 11 हजार 145 मते पडल्याची माहिती पुढे आली आहे. तर महाविकास आघाडीचे संदीप गुळवे यांना 7 हजार 88 मते  तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना 9 हजारब370 मते पडली आहेत. त्यामुळे यांच्यात चुरशीची लढत होत असून या लढतीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किशोर दराडे हे सध्या आघाडीवर असले तयारी अंतिम निकाल येण्यास उशीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


मतमोजणी प्रक्रियेत जास्त मतपत्रिका आढळल्याने खळबळ


मतमोजणी प्रक्रियेत एकूण पाच मतपत्रिका जास्त आढळल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि येवला तालुक्यातील मतपेटीत प्रत्येकी 1 मतपत्रिका जास्त आढळून आली. तर चोपडा तालुक्यातील मतपेटीत 3 मतपत्रिका जास्त आढळुन आल्या होत्या. यावर शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर काही वेळाने मतमोजणी प्रक्रिया सुरळीत सुरु झाली आहे.


मतमोजणीची उद्धव ठाकरेंकडून दखल 


मतमोजणीत पाच जास्त मतपत्रिका आढळल्याची दखल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) घेतली. त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना फोन करत नेमकी काय घटना घडली याबाबतची माहिती घेतली. जर मतपत्रिका सील केलेल्या असतील तर पाच मतपत्रिका जास्त आल्या कशा? आणि कुठल्या जिल्ह्यातल्या याबाबतची माहिती उद्धव ठाकरेंनी घेतली. यानंतर शिवसेना ठाकरे गटाने यावर नेमका काय आक्षेप घेतला आणि त्याचे पुढे काय होणार याची देखील त्यांनी माहिती घेतली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघात गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये काटे की टक्कर; मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ


Uddhav Thackeray : मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग