Anna Hazare on Arvind Kejriwal,  : केजरीवालांचं राजीनामा देण्याबाबतच भाष्य म्हणजे उशिराने सुचलेलं शहाणपण असल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केलंय. मात्र यावर प्रतिक्रिया देताना अण्णा हजारे यांनी आपण केजरीवाल यांना सुरुवातीपासून समाजसेवा करा आपण खूप पुढे जाल असा सल्ला दिला होता. मात्र त्यांनी तो ऐकला नाही आणि शेवटी त्यांना या परिस्थितीला सामोरे जावं लागलं. आता त्यांना याची जाणीव झाल्याचं हजारे म्हणाले आहेत.  


दोन दिवसांत राजीनामा देणार, केजरीवाल यांची मोठी घोषणा 


अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर त्यांनी आज (दि.15) दिल्लीत कार्यकर्त्यांसी संवाद साधला. कार्यकर्त्यांशी बोलत असताना केजरीवांनी येत्या दोन दिवसात नायब राज्यपालांकडे राजीनामा सूपुर्द करणार असल्याची घोषणा केली. 


अरविंद केजरीवाल काय काय म्हणाले होते?


सीता जेव्हा वनवासातून परतली तेव्हा तिला अग्नीपरीक्षा द्यावी लागली होती. मी आज अग्नीपरीक्षा देतोय. दिल्लीत  फेब्रुवारी महिन्यात विधानसभा निवडणूक आहे. माझी मागणी आहे की, ही निवडणूक नोव्हेंबर महिन्यात घ्यावी. महाराष्ट्रासोबत दिल्लीची विधानसभा निवडणूक होऊ दे. जनतेचा निर्णय येईपर्यंत मी मुख्यमंत्रिपद स्वीकारणार नाही. आता जनतेने मला पुन्हा निवडून दिल्यानंतरच मी आणि मनिष सिसोदिया पदांची जबाबदारी स्वीकारु, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.


केजरीवाल यांच्या जामिनावर कोर्टाच्या कोणत्या 4 अटी


1. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री कार्यालयात जाऊ शकणार नाहीत.
2. प्रकरणाशी संबंधित कोणतीही सार्वजनिक चर्चा करणार नाही.
3. तपासात अडथळा आणण्याचा किंवा साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणार नाही.
4. गरज भासल्यास ट्रायल कोर्टात हजर राहून तपासात सहकार्य करेल.










इतर महत्वाच्या बातम्या


Arvind Kejriwal: आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा; दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार