Anna Hazare On Arvind Kejriwal Delhi Election Result 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीचे (Delhi Election Results 2025) अंतिम कौल आता हाती येऊ लागले आहे. अशातच सकाळपासूनच आम आदमी पक्ष (AAP) आणि भाजपमध्ये (BJP) मोठ्या चुरसीचा सामना रंगताना दिसत असताना आम आदमी पक्षाला दिल्लीत मोठा धक्का बसला आहे. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. भाजपचे परवेश वर्मा (Parvesh Varma) यांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर मात केली आहे.


दरम्यान, अरविंद केजरीवालांच्या पराभवावर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी पहिली प्रतिक्रिया देत थेट केजरीवालांच्या चारित्र्यावर बोट ठेवलं आहे. (Anna Hazare On Arvind Kejriwal)


'जैसी करणी वैसी भरणी'- अण्णा हजारे


मी वेळोवेळी सांगत आलो आहे 'जैसी करणी वैसी भरणी', असा हा प्रकार आहे. अरविंद केजरीवाल हे सुरुवातीला जेव्हा माझ्या बरोबर होते त्यावेळी ते फार चांगले होते. मात्र जेव्हा डोक्यात सत्ता, पैसा आणि दारूचं दुकान शिरतं त्यावेळी प्रत्येकाचा ऱ्हास होत जातो. पहिल्यापासून ते जसे राहिले होते तसेच ते राहिले असते तर आज सत्तेत असते. मी कायम त्यांना सल्ला देत आलो आहे की, चरित्र जपलं पाहिजे. आधी ज्यावेळी ते मला भेटायचे त्यावेळेस असे वाटायचं की ते काहीतरी चांगलं करू शकतील. मात्र मधल्या काळात त्यांच्याकडे बघून हा विश्वास नाहीसा झाला. किंबहुना ते पुन्हा सत्तेत येतील की नाही हे आज सांगता येत नसल्याचे विधानही ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केलं आहे. 


..... त्या दिवसापासून मी बोलणं बंद केलं! - अण्णा हजारे


अरविंद केजरीवाल यांनी ज्यावेळेस राजकारणात जायचा निर्णय घेतला आणि पक्ष काढला त्यावेळेस पासून मी त्यांच्याशी बोलणे बंद केले. पक्ष काढल्यानंतर मी परत त्यांच्याशी कधीही बोललो नाही. त्या दिवसापासून मी संबंध तोडून टाकले. कारण माझ्यापुढे पक्ष विरहित समाजसेवा, देशहित हेचं प्रधान्य होतं आणि आम्हाला तेच हवं आहे. असेही अण्णा हजारे म्हणाले.



अरविंद केजरीवाल यांचा जवळपास 1200 मतांनी पराभव झाला. याआधीच आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचाही पराभव झाला. याशिवाय दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी मार्लेना (Atishi Marlena) विजयी झाल्या आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या