Ankita Patil on Ajit Pawar : "2014 आणि 2019 जे घडले त्याच्या जखमा अजून भरल्या नाहीत. 20 वर्ष आमचा संघर्ष राष्ट्रवादीशी झाला आहे. पुढे विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती धर्म सगळ्यांनी पाळाला पाहिजे. काही गोष्टी आपल्याला निकाल लागल्यावर आपल्या बसून करायच्या आहेत",असं माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील म्हणाल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत इंदापुरात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अंकिता पाटील बोलत होत्या. या कार्यक्रमाला अजित पवारांनी सहकुटुंब सहपरिवार हजेरी लावणार. या मेळाव्याला  हर्षवर्धन पाटील, अंकिता पाटील, निहार ठाकरे, राजवर्धन पाटील हे देखील उपस्थित असणार आहेत. मेळावा झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्या घरी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.


नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचा आहे


अंकिता पाटील म्हणाल्या, निधीत अन्याय झाला, खोट्या केसेस झाल्या. सुनेत्रा काकी निवडणुकीत उभ्या राहिल्यात पण मला असं वाटत की, माझी आई उभी राहिली आहे. नाराजी दूर झाली आहे, काही उरलेली आहे ती आता दूर झालेली पाहायला मिळेल. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचा आहे. आमचा आणि त्यांचा संघर्ष पिढ्यानपिढ्या सुरू आहे. कार्यकर्त्यांचे भरपूर प्रश्न आहेत त्यांचे प्रश्न दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी वेळ दिली होती. आज अजित दादा येणार आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी दूर होईल. अजित पवारांसोबत मोठ्या प्रमाणात लोक आले आहेत. महायुतीचे काम करायला कार्यकर्ते लागतील असे मला वाटत. महायुतीचा धर्म फक्त आम्ही पाळणार नाही तर सगळ्यांनीच पाळायचा आहे. इंदापुरात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातलं आहे. आज अजितदादांसाठी एकादशी असल्याने व्हेज जेवण आहे. 


आपण एकमेकांचा बांध रेटला नाही


 मला पुढे करून मागून पळून जाऊ नका, अशा सूचनाही हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. दुष्काळी परिस्थिती आहे त्या भागात लक्ष दिले पाहिजे. नवीन विकासाचे पर्व सुरू करायचा आहे. आपण एकमेकांचा बांध रेटला नाही. काही लोकांना स्वप्न पडायला लागली आहेत. ती स्वप्न पूर्ण होणार नाहीत, असा टोलाही पाटील यांनी भरणे यांना लगावला. आपल्याला घड्याळ बटन दाबायचे आहे. घड्याळ म्हटले आपल्याला अवघड जात. कमळ रुपी घड्याळ मतदान करायचं आहे. पाहुणा आला की त्याला उपाशी पाठवायच नाही अशी आपली पद्धत आहे, असंही हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केलं. 


इतर महत्वाच्या बातम्या


Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश