Anjali Damania on Ajit Pawar : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात बड्या बिल्डरच्या अल्पवयीन लेकाने दोघांचा जीव घेतल्यानंतर हे राज्यभरात तापू लागलाय. आत्तापर्यंत या प्रकरणात अग्रवाल पिता-पुत्रांसह एका आमदाराचे पायही खोलात गेले आहेत. हे प्रकरण आता ससून रुग्णालयापर्यंत पोहोचले आहे. दरम्यान, आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी पोर्श कार अपघातावरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) घेरलं आहे. त्यांनी ट्वीटरवरुन काही सवाल उपस्थित केले आहेत. 


अंजली दमानिया काय काय म्हणाल्या? 


अजित पवारांना काही प्रश्न 


1. पालक मंत्री म्हणून, आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून तुम्ही ठिय्या देऊन सीपी ऑफिस मधे का नाही बसलात ?


2. जेव्हा फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा पुण्याचे पालक मंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही त्यांचा बाजूला का नव्हतात ?


3. कुठलीही प्रक्तिक्रिया द्यायला ४ दिवस का लागले ? ते पण पत्रकारांनी प्रश्न विचारला नंतर का बोललात ?


4. घटना घडली तेव्हा तुम्ही कुठे होतात ? 


5. तुमचे आणि अग्रवाल कुटुंबाचे आर्थिक संबंध होते का ?


शुल्लक गोष्टींवर भडकणारे अजित पवार, आज पत्रकार परिषदेत गांगरल्यासारखे का होते. जर आरोप खोटे होते तर ते भडकले कसे नाहीत ? बऱ्याच गोष्टी बाहेर येतील, असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत. 


अग्रवालांच्या लेकाला वाचवण्यासाठी ससूनमधील डॉक्टरांची धडपड 


ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे यांनी विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन सूपुत्राला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. अजय तावरेने अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी दुसरेच सॅम्पल घेऊन ते तपासल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यामुळे पुणे अपघात प्रकरणात अनेकांचे पाय खोलात जाण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या तपासामध्ये श्रीहरीने हे कृत्य डॉ. अजय तावरेच्या सांगण्यावरून केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्याने रक्ताचे नमुने बदलले होते. 






इतर महत्वाच्या बातम्या 


मोठी बातमी : डॉ. अजय तावरेंसाठी आमदार सुनील टिंगरेंची शिफारस, हसन मुश्रीफांची मंजुरी, पत्र 'माझा'च्या हाती!