पुणे: भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर करण्यात आलेला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना खोट्या गुन्ह्यात अडवण्यात आल्याचा आरोप करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आता अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 


अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी त्यांच्या सोशल म मिडिया एक्स(पुर्वीचे ट्विटर)वरती पोस्ट लिहून देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. 'देवेंद्र फडणवीस यांनी 4 वर्षा पुर्वीची घटना उकरुण काढीत माझ्या विरुध्द दिल्लीच्या मदतीने CBI FIR दाखल केली आहे. 4 वर्षापुर्वी मी गृहमंत्री असतांना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजपाचे नेते गिरीष महाराज (Girish Mahajan) यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला होता, हा माझ्यावर आरोप आहे. माझ्या माहितीनुसार माझ्यावर रेड टाकुन मला अट‍क करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करीत आहेत. ज्या देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दिल्लीच्या मदतीने ED-CBI ला हाताशी धरुण महाराष्ट्राचे राजकारण अतिशय खालच्या स्तरावर आणले त्यांना सांगु ईच्छीतो की, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मी माझ्या अटकेची वाट पाहत आहे, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. 




माझ्यावर रेड टाकून मला अट‍क करण्याचा प्रयत्न 


अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) माझ्या अटकेची वाट पाहत असल्याचंही म्हटलं आहे, माझ्या माहितीनुसार माझ्यावर रेड टाकुन मला अट‍क करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) करीत आहेत. ज्या देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या मदतीने ED-CBI ला हाताशी धरुण महाराष्ट्राचे राजकारण अतिशय खालच्या स्तरावर आणले त्यांना सांगु ईच्छीतो की, देवेंद्र फडणवीस मी माझ्या अटकेची वाट पाहत आहे, असा उल्लेख त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे. 


काय आहे प्रकरण?


गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकार असताना त्यांना मोक्का अंतर्गत अटक करण्यासाठी अनिल देशमुख यांनी खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता असा गंभीर आरोप केला होता. तसेच हा संपूर्ण प्रकार प्रवीण मुंडे यांनीच माझ्या लक्षात आणून दिल्यानंतर मी या संदर्भात अनिल देशमुख यांना जाब विचारला होता असे देखील गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी म्हटलं होतं. याप्रकरणी नुकतच सीबीआयकडून चौकशी करण्यात आली असून आता अनिल देशमुख यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


 CBI कडून अनिल देशमुखांविरुद्ध गुन्हा दाखल


माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणी वाढ झाली असून सीबीआयकडून त्यांच्यवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप करत त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.