Andheri Bypoll Election : अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करणे योग्य होईल आणि याने महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले आहेत. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांचं समर्थन करत आज पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. रमेश लटके यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ऋतुजा रमेश लटके या निवडणूक लढत आहे. मुरजी पटेल यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्रत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकी झाली. मी राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून तेंव्हा भूमिका घेतली होती की, मुंडेच्या परिवारातील कोणीही उभा राहत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उभा करणार नाही, अशी भूमिका घेतली होती.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, रमेश लटके यांचा योगदान पाहता. ही निवडणूक बिनविरोध करणे योग्य राहील, आणि एक चांगला संदेश जाईल. महाराष्ट्रत योग्य संदेश जाण्यासाठी ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे, असं ते म्हणाले आहेत. यावेळी शरद पवार यांनी भाजप आणि इतर उमेदवारांना आवाहन केलं आहे की, अंधेरी पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करू नका. अंधेरी पोटनिडणूक बिनविरोध व्हावी. ते म्हणाले आहेत की, अर्ज मागे घेण्याची मुदत अजून संपली नाही, म्हणून आवाहन केल्याचं ते म्हणाले. तसेच एक वर्षासाठी निवडणूक नको, असंही ते म्हणाले आहेत.
शरद पवार म्हणाले की, ही निवडणूक फक्त दीड वर्षासाठी आहे, वर्ष दीड वर्षासाठी ही निवडणूक टाळता आली तर बरं होईल. अर्ज मागे घेण्याची वेळ अजून गेलेली नाही. त्यामुळे आज मी संबंधितताना आवाहन केलं आहे. मला स्वतः ला वाटत एक वर्षासाठी निवडणूक नको. ते म्हणाले, रमेश केरे यांनी मला काही मेसेज काही दिवसांपूर्वी केले होते, आशा प्रकारची टोकाची भूमिका घेणे योग्य नाही.
पवार म्हणाले, खेळामध्ये आम्ही राजकारण आणत नाही. मी बीसीसीआय एमसीएचा अध्यक्ष होतो. तेंव्हा नरेंद्र मोदी यांनी पाठींबा दिला, तेंव्हा ते गुजरात चे मुख्यमंत्री होते. आता सुद्धा एमसीएम बीसीसीआय निवडणुकीत आताच्या संघटना सुद्धा चांगलं काम करत आहेत, त्यात राजकारण येत नाही. निवडणूक आयोगाने आपलं काम योग्य पद्धतीने करावं निवडणूक आयोग स्वायत्त आहे. खरंतर गुजरात आणि हिमाचल प्रदेशचा निवडणूक कार्यक्रम एकत्र जाहीर करायला पाहिजे होता. मात्र अशा प्रकारे निवडणूक आयोगाच्या भूमिकांमुळे संशय व्यक्त केला जातो.