नवी मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते (Anant Geete) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून (Raigad Lok Sabha) माझी उमेदवारी जाहीर केली आहे, असा दावा अनंत गीते यांनी केला. ते मुंबईत बोलत होते.
अनंत गीते म्हणाले, "रायगड लोकसभेतून मला उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मी रायगड लोकसभा लढवणार आहे". खोपोली येथील रमाधाम वृ्द्धाश्रमासाठी ही बैठक आहे. बैठकीला पक्षाचे नेते , उपनेते, आमदार , मुंबई विभागप्रमुख, रायगडचे जिल्हाप्रमुख, उपस्थित राहणार आहेत. यावेळी इतर विषयांवर चर्चा होईल. कोकण पदवीधर मतदार संघाचा उमेदवार उद्धा उद्धव ठाकरे जाहीर करतील, असंही अनंत गीते यांनी सांगितलं.
मावळमध्ये श्रीरंग बारणेंचा पराभव करणार (Thackeray group will defeat Shrirang Barne)
दरम्यान, यावेळी अनंत गीते यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याबाबतही भाष्य केलं. "मावळमधून खासदार श्रीरंग बारणे यांचा पराभव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करेल", असा विश्वास अनंत गीते यांनी व्यक्त केला.
रायगड लोकसभा मतदारसंघ (Raigad Lok Sabha Election result 2019)
रायगड लोकसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे हे खासदार आहेत. त्यांनी 2019 मध्ये शिवसेनेचे तत्कालिन खासदार अनंत गीते यांचा पराभव केला होता. आता राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्ष फुटले आहेत. त्यामुळे दोन्ही गटाच्या दोन्ही बाजूकडून या मतदारसंघावर दावा करण्यात येत आहे. नेहमीप्रमाणे 2019 मध्येही लोकसभेची कोकणातील रंगतदार लढत म्हणून रायगड लोकसभा निवडणुकीकडे पाहिलं गेलं. 2014 मध्येही सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते अशी लढत झाली होती. त्यावेळी अनंत गीते यांनी विजय मिळवला होता. 2014 च्या निवडणुकीत सुनील तटकरे यांचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला होता. मात्र 2019 मध्ये सुनील तटकरेंनी बाजी मारुन पराभवाचा वचपा काढला होता.
आता येत्या निवडणुकीत रायगड लोकसभेत कोणत्या गटाकडून कोण उमेदवार असणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.
VIDEO : अनंत गीते नेमकं काय म्हणाले? (Anant Geete on Raigad Lok Sabha)