Ravi Rana On Rohit Pawar : अमरावती : रोहित पवार यांचा अभ्यास कमी आहे. अमित शाह (Amit Shah) यांच्या सभेला लाखोंच्या संख्येने लोक आले होते. या सर्व लोकांच्या सोयीसाठी इतक्या तळपत्या उन्हात त्यांना पाणी पाजण्यासाठी आम्ही काही महिला लावल्या होत्या. त्यासाठी त्यांना मोबदलाही दिला होता. मात्र, या पाणी वाटप करणाऱ्या महिलांऐवजी जर रोहित पवार (Rohit Pawar) आले असते तर, आम्ही महिला लावल्याच नसत्या. तसेच त्यांना सभेचे वास्तव देखील माहित पडले असते. सभेत नागरिकांना पिण्याचे पाणी वाटपासाठी ज्या महिला लावल्या होत्या, त्यांच्याच व्हिडrओ विरोधकांनी घेतला आणि त्यात महिलाही खरं बोलल्या आहेत. मात्र रोहित पवारांचा अभ्यास कमी असल्याने ते अशा खोट्या अफवा पसरवत असल्याचे म्हणत आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी रोहित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ते अमरावती येथे बोलत होते.
रोहित पवारांचा अभ्यास कमी
अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ 24 एप्रिलला अमरावतीमध्ये भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला प्रमुख्याने केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे स्टार प्रचारक अमित शाह यांनी आपली उपस्थिती लावत विरोधकांवर चौफर फटकेबाजी केली. तर दुसरीकेडे या सभेसाठीच्या मैदानावरुन प्रहारचे सर्वेसर्वा आणि भाजपमध्ये हाई वोल्टेज ड्रामा रंगल्याचे देखील बघायला मिळाले होते. अशातच आता या सभेमध्ये लोकांना पैसे देऊन आणण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवारांनी केला होता. यासाठी त्यांनी काही महिलांना पैसे वाटप करण्यात आल्याचा व्हिडीओही समाज माध्यमांवर प्रसारित करत टीका केली होती. त्यावरून आता आमदार रवी राणा यांनी रोहित पवारांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
दोन ते तीन लाखांच्या लीडने नवनीत राणांचा विजय- रवी राणा
अमरावती लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये 60.36 टक्के मतदान झाले होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभेला प्राथमिक 64.02 टक्के मतदान झालं. यंदाच्या निवडणुकीत मतदानात 3.66 टक्के वाढ झाली आहे. याविषयी बोलताना आमदार रवी राणा म्हणाले की, मोदीजींची हवा महाराष्ट्रात आणि देशात मोठ्या प्रमाणात आहे. तसेच सूक्त प्रमाणात त्यांची लाट देखील आहे. ज्या मोठ्या प्रमाणात मतदान झालं, त्यामध्ये मोदीजींचा सिंहाचा वाटा आहे. ज्या प्रमाणात नवनीत राणा यांचा चाहता वर्ग आहे, विकास काम आहे, जनसंपर्क आहे, त्यामुळे अशी संधी सोडू नये. असे प्रत्येकाला वाटले, म्हणून मोठ्या प्रमाणात महिलांचे, युवकांचं मतदान झालं. ती ताकद तुम्हाला निकालात दिसेल. दोन ते तीन लाखांच्या लीडने नवनीत राणा निवडून येतील, असा विश्वासही रवी राणा यांनी बोलताना व्यक्त केलाय.
महत्वाच्या इतर बातम्या