Amravati Lok Sabha Constituency : अमरावती : रिपब्लिकन सेनेचे (Republican Sena) अध्यक्ष आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून (Amravati Lok Sabha Constituency) दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना आनंदराज आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) मला पाठिंबा देणार, असा विश्वास व्यक्त केलेला. पण असं काही झालं नाही. वंचित बहुजन आघाडीनं आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा जाहीर केला नाही. त्यामुळे आनंदराज आंबेडकरांनी आपला लोकसभा निवडणुकीसाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अशातच अमरावतीत भाजपला यश मिळू नये यासाठी त्यांनी वंचितच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे.
रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी यासंदर्भात एक पत्रक जारी केलं असून याच पत्रकातून त्यांनी वंचितला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे लहान बंधू रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी 2 एप्रिलला अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली. वंचित बहुजन आघाडीकडे पाठिंब्यासाठी मागणी केली होती, परंतु वंचितनं पाठिंबा न दिल्यानं आनंदराज आंबेडकर यांनी माघार घेतली. मात्र, तरीही भाजप निवडून येऊ नये, यासाठी वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची माहिती आनंदराज आंबेडकर यांनी एका पत्रातून दिली आहे. आज अमरावतीत वंचितचा उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
भाजपला फायदा होऊ नये म्हणून, वंचितला पाठिंबा
रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर आज अमरावती लोकसभेसाठी अर्ज दाखल करणार होते. विशेष म्हणजे, वंचित बहुजन आघाडी अमरावतीत आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा देणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. सध्या असा काही निर्णय झालेला नाही. मुंबईत पक्षात यावर चर्चा होईल. निर्णय झाल्यानंतर आपल्याला कळवणार अशी माहिती यासंदर्भात बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी 'एबीपी माझा'ला दिलेली. पण, आनंदराज आंबेडकरांना वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा जाहीर केला नाही. त्यामुळे आनंदराज आंबेडकरांनी स्वतःच आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं आहे.
रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराव आंबेडकरांनी अमरावती लोकसभेची उमेदवारी दाखल केली. त्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून भव्य रॅली काढण्यात आलेली. यावेळी आनंदराव आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी मला पाठिंबा देणार आहे, तसं बोलणं झालं आहे, असं एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. पण वंचितनं आपला उमेदवार जाहीर केला.