अमरावती : शहरातील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या प्रभू कॉलनी परिसरात पतीने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  पत्नीचा मृतदेह घरात दडवून पती पसार झाला आहे. पोलिसांकडून पतीचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणामुळे अमरावती शहरात (Amravati Crime News) मोठी खळबळ उडाली आहे. 


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री अक्षय लाडे ही विवाहित युवती पती अक्षय सोबत वादविवाद झाल्याने माहेरी राहायला आली होती. काल रात्री सायंकाळी ती प्रभू कॉलनी येथे दुचाकी वाहनाने कपडे आणायला गेली. मात्र, रात्रभर घरी न आल्याने भाग्यश्रीच्या आईने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात भाग्यश्री बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. फ्रेजरपुरा पोलिसांच्या पथकाने तातडीने दखल घेत भाग्यश्रीचा फोन ट्रेस केला असता भाग्यश्रीचे दुचाकी वाहन हे रेल्वे स्टेशन परिसरात आढळून आले. त्यातच तिचा फोन देखील होता. पोलिसांनी रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता  त्यात सदर वाहन हे भाग्यश्रीचा पती अक्षय लाडे यानेच रेल्वे स्टेशनपर्यंत आणल्याचे निष्पन्न झाले. 


पत्नीचा मृतदेह घरात दडवून पती पसार


या आधारे पोलिसांनी तत्काळ भाग्यश्रीचे प्रभू कॉलनी येथील घर गाठले असता घराला कुलूप लावलेले होते. मात्र पोलिसांना शंका आल्याने त्यांनी दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी भाग्यश्री ही बेडरूममध्ये मृत पडलेली दिसली. तसेच तिच्या मानेवर चाकूने आणि हाता पायावर देखील वार केल्याचे दिसून आले. पत्नीचा मृतदेह घरात दडवून पती पसार झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून भाग्यश्रीचा पती अक्षय लाडेच्या अटकेसाठी पोलिसांनी पथक रवाना केलेली आहेत. पोलीस पुढील तपास करीत आहेत. 


नागपुरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दुहेरी हत्याकांड


नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूरात दुहेरी हत्याकांड झाल्याची घटना घडली. यात पोटच्या मुलाने आई -वडिलांची हत्या केली आहे. नागपूरच्या कपिल नगर पोलीस ठाण्याअंतर्गत खसाळा कॅम्पसमध्ये ही घटना घडली आहे. लीलाधर डाखोडे आणि अरुणा डाखोडे अशी मृतांची नावे असून आरोपी हा त्याचाच मुलगा उत्कर्ष डाखोडे आहे. मृतक लीलाधर हे कोराडी थर्मल प्लांटमध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करतात. तर अरुणा विनोबा भावे नगर येथील एका खाजगी शाळेत प्राथमिक शिक्षिका होत्या. आरोपी उत्कर्ष हा 6 वर्षांपासून अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. वारंवार अपयश आल्याने उत्कर्षच्या पालकांनी अभ्यास सोडून शेती करण्याचा सल्ला देत होते. पण उत्कर्ष अभियांत्रिकी पूर्ण करण्याच्या त्याच्या आग्रहावर ठाम होता. मात्र आरोपी उत्कर्षला एमडीचे व्यसन होते आणि या व्यसनामुळे त्याला अभ्यास करता येत नव्हता. आई-वडिलांच्या सततच्या समजुतीमुळे तो चिडला आणि रागाच्या भरात त्याने आपल्या आई-वडिलांची हत्या करण्याचा घातक प्लॅन तयार केला. आधी आई अरुणाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली.


आणखी वाचा 


Mumbai Crime : बाप आहे की सैतान... पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत नको ते कृत्य, मुंबईतील धक्कादायक घटना