Amol Mitkari on Ajit Pawar : मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं खरच कौतुक वाटत. एक व्यक्तीने राज ठाकरेवर पोस्ट लिहिली त्याला अद्दल घडवण्याच काम मनसे कार्यकर्त्यांनी केलं. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणी बोललं तर पूर्ण भाजप त्यावर तुटून पडतं. परंतु अजित पवारांवर (Ajit Pawar) गल्लीबोळातील हाके बोलतो आणि त्यावर बोलायला कुणीही नाही. केवळ अजित पवारांकडे काम करून घ्यायला यायचं आणि त्यांच्यावर कोणी बोलत असेल तर गप्प बसायचे हे योग्य नाही. अशी भावनिक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी दिली आहे.

जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या मालकाने मराठी भाषा बोलण्याची गरज काय, असे वक्तव्य केले होते. त्यावरुन मनसेचे कार्यकर्ते त्याला जाब विचारायला गेले होते. तेव्हादेखील या दुकान मालकाचा मराठी न बोलण्याचा हेका कायम होता. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी या दुकान मालकाच्या कानाखाली जाळ काढला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. याच मुद्द्यावर बोट ठेवत अमोल मिटकरी यांनी पक्षातील खंत बोलून दाखवली आहे. अलीकडेच अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे वक्तव्य केले होते. पुढील आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाची शासकीय महापूजा अजित पवार (Ajit Pawar) यांनी सपत्नीक मुख्यमंत्री म्हणून करावी, अशी प्रार्थना त्यांनी विठ्ठल चरणी केली असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यातच त्यांनी आता पुन्हा पक्षातील एकजुटी बाबत सवाल उपस्थित केला आहे. 

धनंजय मुंडे यांनी कुणासोबत राहावं हे त्यांनी ठरवावं   

धनंजय मुंडे यांचा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासोबत एकत्र फोटो पुढे आला आहे. यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, आता त्यांनी लक्षात घ्याव आपल्या प्रमुख नेत्यावर कोणी बोलत असताना आपण त्याच्यासोबत रहावं, की जो टीका करतो त्याच्या सोबत रहावं, असेही मिटकरी म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या