Amit Shah, नाशिक : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhansabha Election) तोंडावर महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये सभा घेत विधानसभा निवडणुकीची रणनीती सांगितली आहे. एकीकडे गेल्या दोन वर्षात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडलेली असताना आता अमित शाहांनी नवा प्लॅन सांगितला आहे. शिवसेना ठाकरे गट (Shivsena Uddhav Thackeray) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar) आणि काँग्रेसचे कार्यकर्ते  आपल्याकडे जोडा अशा सूचना अमित शाहा यांनी दिल्या आहेत. 


2024 मध्ये भाजपाची बहुमताने सत्ता येईल याचा विश्वास


अमित शाह म्हणाले, 16 राज्यात आमची सत्ता आहे. तुमचे सगळे मिळून जेवढे जागा आलेत त्यापेक्षा जास्त जागा आमचे आले आहेत. 2024 मध्ये भाजपाची बहुमताने सत्ता येईल याचा विश्वास आहे. काहीजण मुख्यमंत्री आणि पंतप्रधान होण्यासाठी निवडणूक लढत असतात.  मात्र आम्ही भारत घडवण्यासाठी निवडणूक लढवतो. 370 जाईल कुणाला वाटत होता का,राम मंदिर होणार अस कुणाला वाटत होतं का? असा सवालही शाह यांनी केला.


 नक्षलवादी आणि आतंकवाद शेवटचे घटका मोजत आहेत 


पुढे बोलताना शाह म्हणाले, हिवाळी अधिवेशनात वक्फ बोर्ड कायदा मंजूर केला जाणार आहे. आतंकवादी आणि पाकिस्तानकडून हल्ले होत होते. देशाच्या सीमेसोबत छेडछाड केली तर घरात घुसून मार पडणार आहे. नक्षलवादी आणि आतंकवाद शेवटचे घटका मोजत आहेत. देशातील 3 नंबरची अर्थ व्यवस्था होण्याचा मार्गावर आपण आहोत. विरोधकांना फक्त राजकारण करायचे आहे. खूप महत्वपूर्ण या निवडणुका आहेत आज उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे. पश्चिम महाराष्ट्र,कोकण आणि मुंबईमध्ये पण जायचे आहे.


महाराष्ट्र 2024 चे निवडणूक राज्याचा चेहरा बदलणार आहे. वैचारिक लढाई आहे. कार्यकर्ता म्हणून काम करा. एकदा निवडणूक जिंका 2029 मध्ये पुन्हा 300 पार जाणार आहोत. एक संकल्प घेऊन पुढे या कमी जागा मिळवल्याचे अपयश पुसून टाका, असंही अमित शाह म्हणाले.


आपल्या आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोहबत की दुकान बोलताना झूठ की दुकान उघडली आहे. राम मंदिर, 370 कलम हटवले हे निर्णय झाले की नाही. जोशमध्ये नाहीतर होश सांभाळून धैर्यपूर्वक निवडणुकीला समोरे जा, असं आवाहन अमित शाह यांनी केलं. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Pune Metro: स्वारगेट भुयारी मेट्रो मार्ग पुणेकरांसाठी होणार खुला; मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये