मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अमित शाह (Amit Shah) आणि भाजपवर हल्लाबोल केला. भाजपचे छत्रपती संभाजीनगरचे सरचिटणीस दिनेश परदेशी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते. उद्धव ठाकरेंनी दिनेश परदेशींचं पक्षात स्वागत केलं. यावेळी बोलताना ठाकरेंनी केंद्रीय मंत्री भाजप नेते अमित शाह यांच्यावर बाजारबुणगे म्हणत हल्लाबोल केला. 


सर्व शिवसैनिकांचं  मातोश्रीमध्ये स्वागत आहे. गेल्या आठवड्यात आपल्या इकडं येऊन गेलो होतो, त्यावेळी दिनेश परदेशी प्रवेश करणार होते. भाजपमधून तुम्ही इकडं आलात, भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांना तुमच्या मध्ये सुरु झालेला भेसळीचा कार्यक्रम तुम्हाला मान्य आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.  हिंदुत्वाच्या नावावर या लोकांनी थोतांड माजवलंय, माझं हिंदुत्व वेगळं आहे, असंही ठाकरे म्हणाले. 


महाराष्ट्रा बाहेरचे बाजारबुणगे नागपूरमध्ये येऊन गेले, ठाकरेंचा हल्लाबोल


अमित शाह विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत आहेत. काल परवा कालच महाराष्ट्राबाहेरचे बाजारबुणगे नागपूरमध्ये येऊन गेले आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करुन गेले आता ते भाषण मी पण ऐकलेलं नाही असं ठाकरेंनी म्हटलं.हे बाजारबुणगे आहेत त्यांना महाराष्ट्र टाचेखाली घ्यायचा आहे.त्यांना कल्पना नाही हा महाराष्ट्र वीरांचाआहे, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.  


आपल्याकडे बोलण्यासारखं खूप आहे, बाजारबुणगे असा शब्द जाणीवपूर्वक वापरतो. उद्धव ठाकरेंना खतम कर, पवारसाहेबांना खतम करा असं म्हणतो, हिंमत असेल तर येऊन बघ कोणाला महाराष्ट्र खतम करतो ते दाखवून देतो, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं. 


वैजापूर आपला मतदारसंघ आहे, वाणी कुटुंबाला धन्यवाद देतो, वाणीसाहेब आपल्यासोबत नाहीत पण वाणीसाहेबांची निष्ठा घेऊन त्यांचं कुटुंब शिवसेनेसोबत राहिलं आहे. वाणी साहेबांना निवडणूक लढण्यासाठी आग्रह केला होता, तुम्ही उमेदवार म्हणून आग्रह केला होता. मात्र त्यांनी नव्या माणसाला पुढं आणू म्हटलं पण त्यांना काय माहिती तो गद्दार निघेल, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी रमेश बोरणारे यांच्यावर नाव न घेता केला.


येत्या विधानसभा निवडणुकीत निष्ठेचा भगवा झेंडा वैजापूरवर फडकवा, प्रचाराच्या निमित्तानं वैजापूरला येईनचं,विजयाची जबाबदारी तुमच्यावर देतो, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. 


इतर बातम्या :


बाहेरुन आलेल्यांवर नाराज आहात का?; अमित शाहांनी प्रश्न विचारताच भाजप कार्यकर्त्यांनी स्टेजवर बसलेल्या अशोक चव्हाणांकडे थेट बोट दाखवलं