BJP Leader Amit Shah: भारतात राजकारण्यांसाठी निवृत्तीचे वय ठरलेले नाही. काहीजण लवकर निवृत्त होतात, तर काहीजण वयाच्या शेवटपर्यंत राजकारणात सक्रीय राहतात. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवृत्तीबाबत मोठे विधान केले आहे. राजकीय निवृत्तीनंतर पुढील आयुष्यात काय करणार हे अमित शाह (Amit Shah) यांनी अहमदाबादमधील एका कार्यक्रमात सांगितलं. राजकारणातून निवृत्त झाल्यावर मी आयुष्यभर नैसर्गिक शेती (Farming) करण्याचे ठरवले आहे. तसेच निवृत्तीनंतर संपूर्ण आयुष्य वेद, उपनिषद वाचण्यात वेळ घालवणार असल्याचे अमित शाह यांनी सांगितले.

'जेव्हा पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते, त्याचा अर्थ आता थांबावे असा असतो'. पंच्याहत्तरीनंतर माणसाने बाजूला होत इतरांना संधी दिली पाहिजे, असा संघकार्याचा (RSS) वस्तुपाठ मोरोपंत पिंगळेंनी घालून दिला होता याची आठवण सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी काढली..'मोरोपंत पिंगळे, आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्जन्स' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मोहन भागवतांनी ही आठवण सांगितली. मोहन भागवतांनी केलेल्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

RSS chief Mohan Bhagwat: वयाची पंचाहत्तरी झाल्यानंतर राजकारणातून निवृत्त होण्याचा सल्ला, मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रसिद्धी पराडमुखपणे कार्य करून पंच्याहत्तरीनंतर निवृत्त होण्याचा वस्तुपाठ मोरोपंत पिंगळेंनी घालून दिला होता. मोरोपंत पिंगळे यांच्या पंचहत्तरीची आठवण सांगत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सूचक वक्तव्य केले आहे. नागपुरातील वनामती सभागृहात संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी दिवंगत मोरोपंत पिंगळेंच्या जीवनावरील इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी मोरोपंत पिंगळे यांच्या पंचहात्तरीची आठवण सांगताना सरसंघचालक म्हणाले की, वृंदावन येथे आयोजित संघाच्या एका बैठकीत मोरोपंत पिंगळेंच्या पंच्याहत्तरी निमित्त त्यांचे सत्कार करण्याचे ठरले. त्यावेळी तत्कालीन सरकार्यवाह हो.वो. शेषाद्री यांनी मोरोपंतांचा शाल पांघरून बहुमान केला. त्यावेळी मोरोपंत म्हणाले होते की, 'पंच्याहत्तरीचा अर्थ मला कळतो. माणसाची पंच्याहत्तरी झाली की, आपण बाजुला होऊन इतरांना संधी दिली पाहिजे', असे मोरोपंत तेव्हा म्हणाले होते, अशी आठवण सरसंघचालकांनी यावेळी सांगितली.

राम जन्मभूमी आंदोलनातही मोरोपंतांनी अशोक सिंघल यांनाच समोर ठेवले. स्वतः कधीही पुढे-पुढे केले नाही. प्रसिद्धीपासून लांब राहून कार्य करण्याचा वस्तुपाठ त्यांनी आपल्या आचरणातून मांडला होता. आत्मविलोपाची खडतर साधना त्यांनी लहानपणापासून केली होती. त्यांचे डोंगरा इतके कार्य संघाला समर्पित होते. परंतु, अमुक एक गोष्ट मीच करील अशी भावना त्यांच्या मानात नव्हती, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले.

आणखी वाचा

देशात इंग्रजी बोलणाऱ्यांना स्वतःची लाज वाटेल; अमित शाह भारतीय भाषांबद्दल काय म्हणाले?