मुंबई: भाजपचा सध्याच्या निवडणुकीचा चेहरा हा नरेंद्र मोदी हेच आहेत आणि ते त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करतील असं सांगत पंतप्रधानपद इतरांना कुणाला देण्यात येईल हा विरोधी पक्षांचा दावा केंद्रीय अमित शाह (Amit Shah) यांनी खोडून काढला. या पुढच्या म्हणजे 2029 सालीही नरेंद्र मोदी हेच भाजपचा चेहरा असतील असंही अमित शाहांनी सांगितलं. 'एबीपी माझा'शी खास संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
यावेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात टप्प्याटप्प्याने मतदान होत आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि प्रमुख विरोधी पक्षांचे नेते निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनीही पुढील लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती जाहीर केली आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत म्हणजेच 2029 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचा चेहरा हे नरेंद्र मोदी हेच असतील असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आपचे अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या दाव्यावर अमित शाहांनी हा खुलासा केला आहे.
अमित शाह म्हणाले की, "नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून 2029 चा कार्यकाळ पूर्ण करतील आणि 2029 नंतरही भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक प्रचाराचे नेतृत्व करतील." मोदी पंतप्रधान होणार आहेत. आगामी निवडणुकाही भाजप पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे.
बंगाल, ओडिशा, तेलंगणा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये आमच्या जागा वाढतील, केरळमध्ये आम्ही खाते खोलणार असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.
सध्याच्या लोकसभा निवडणुकीत म्हणजेच 2029 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 400 हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे. यावेळी भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक लढवत असून नरेंद्र मोदी हे पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवारही आहेत.
सात टप्प्यात निवडणुका, 4 जूनला निकाल लागणार
18 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यांत मतदान होत आहे. आतापर्यंत चार टप्प्यांत मतदान पूर्ण झाले असून 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात, 25 मे रोजी सहाव्या टप्प्यात आणि 1 जून रोजी सातव्या टप्प्यात मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे.
ही बातमी वाचा:
VIDEO Zero Hours Amit Shah Full : पक्षफुटी, सत्तांतर ते जागांचं समीकरण? अमित शाह EXCLUSIVE ABP MAJHA