Chhtrapati Sambhajinagar: पुढच्या वर्षी पांडुरंगाची पूजा उद्धव ठाकरे करतील आणि आम्ही त्यांच्या सोबत असू असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणालेत. छत्रपती संभाजीनगरच्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मणी मंदिरात दर्शन घेत, पाऊस होऊ दे आणि पुढच्या वर्षी महाविकास आघाडीचे सरकार येऊ दे असं विठ्ठलाला साकडं घातलं असल्याचे दानवे यांनी सांगितलं.
लाडका भाऊ योजनेची फक्त घोषणा असून ही योजना नवी नसून ही घोषणा खोटी असल्याचे सांगत त्यांनी ही योजना नक्की कशी आहे हे आमने सामने येऊन सांगावं असे खुलं चॅलेंज दानवेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे.
पुढच्या वर्षी महाविकास आघाडी सरकार येऊ दे- अंबादास दानवे
शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आषाढी एकादशीनिमित्त छत्रपती संभाजीनगरच्या छोटे पंढरपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या पंढरपुर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेतलं. इथे शेकडो दिंड्यांमध्ये मीही सहभागी झालो आहे. वारकऱ्यांसोबत विठ्ठलाच्या भक्तीत सहभागी झालो असल्याचे सांगत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार यावे, असे साकडे घालत पांडुरंगाला प्रार्थना केल्याचे दानवे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना खुलं चॅलेंज, आमनेसामने येऊन योजना कशीये ते सांगा..
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजनेची घोषणा केल्यानंतर ही घोषणा पूर्णपणे खोटी असून 1974 पासून ते महाराष्ट्रात सुरू आहे. यांनी फक्त त्याचं नाव बदललं आहे असं म्हणत ही योजना नक्की कशी आहे हे आमने-सामने येऊन सांगावे असे खुले चॅलेंज अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे.
"ही फक्त घोषणा आहे. ही योजना 1974 पासून महाराष्ट्रात सुरू आहे. यांनी फक्त तिचं नाव बदललं. उद्योग विभाग आणि कौशल्य विभागामार्फत ही योजना राबवली जाते. , जी मुलं शिकलेली आहे आणि ज्या कंपनीला त्यांची गरज आहे, अशा मुलांना बोलावून सहा महिन्याचं मानधन देत असतात. यांनी एवढंच केलं की कंपन्यांना मानधन देण्याऐवजी विद्यार्थ्यांना मानधन देण्याची घोषणा केली आहे. ही कोणतेही योजना नाही, फक्त खोटी घोषणा आहे असे मी दाव्यासहीत सांगतो." असे अंबादास दानवे म्हणाले.
शरद पवार गट प्रवेश सोहळा
अजित पवार गेटातील नेते आशरथ पवारांची भेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे विचारतात शुभेच्छा त्यांना असे म्हणत दानवे यांनी यावर बोलणे टाळले. आता लोकसभा झाली आहे. आता आपण पांडुरंगाच्या चरणी आलो आहोत त्यामुळे राजकारणात जाऊ नये असे म्हणत पुढच्या वेळी पांडुरंगाच्या चरणी महाविकास आघाडीचे मंत्रिमंडळ दिसेल असे दानवे म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्तारावर दानवे म्हणाले..
भाजप गाजर दाखवणारा पक्ष आहे. त्यामुळे कोणताही मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. मंत्रिमंडळ विस्तारामुळे दोन जण खुश होण्यापेक्षा 10 जण नाराज होणार आहे. त्यामुळे ज्यांनी जॉकेट शिवून ठेवले आहे त्यांनी आता ते जॉकेट कुणाला तरी देऊन टाकावे.
हेही वाचा: