Sharad Pawar on Ajit Pawar : शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुंग लावून अजित पवार भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले असले, तरी ते पुन्हा एकदा एकत्र होतील, अशी चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळामध्ये होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला मिळालेले दणदणीत यशानंतर अजित पवार गटाचे काय होणार? अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये बोलताना शरद पवार यांनी उत्तर दिले. 


अजित पवार पुन्हा परत येणार का?


अजित पवार पुन्हा परत येणार का? याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, निवडणुका येतात आणि जातात. कुटुंब कायम राहतं. ते पुढे म्हणाले की, घरामध्ये सगळ्यांना जागा आहे. मात्र, पक्षांमध्ये जागा आहे की नाही हा व्यक्तिगत निर्णय मी घेणार नाही. माझे सगळे सहकारी संघर्षाच्या काळामध्ये मजबुतीने उभे राहिले त्यांना पहिल्यांदा विचारेन आणि ती तयार झाली तर असे म्हणत त्यांनी हा निर्णय एकट्याचा होणार नसल्याचे स्पष्ट केले.



तरी बारामतीमध्ये लोकांनी तुम्हाला का निवडलं? 


अजित पवारांनी बारामतीमध्ये विकास केला, तरी बारामतीमध्ये लोकांनी तुम्हाला का निवडलं? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. यावर बोलताना  शरद पवार यांनी अरे ती बारामती आहे असे म्हणताच हशा झाला. लोकांशी वैयक्तिक संबंध ठेवले पाहिजेत. याआधी मी फक्त शेवटची सभा घ्यायचो. मी 50 टक्के लोकांना नावाने ओळखायचो, पण आता जुनी लोकं नाहीत. मला खात्री होती की लोक सुप्रियाला निवडून देतील. 


छगन भुजबळांवर काय म्हणाले?


निवासस्थानी येऊन भेट घेऊन गेलेल्या छगन भुजबळांवरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की,  हल्ली त्यांची एक दोन भाषणं चांगली झाली. ते म्हणाले की, त्यांनी माझ्याबदल आस्था आणि कौतुक व्यक्त केलं. भेटल्याशिवाय जाणार नाही असं म्हणाले, म्हणून मी भेटलो. मुख्यमंत्र्यांचे सहकारी जरांगे पाटील यांना भेटले. त्यांचा सुसंवाद काय झाला आम्हाला माहिती नाही. शिंदे आणि जरांगे यांचा काही, तरी संवाद होता. ओबीसीबाबत एका गृहस्थांनी उपोषण केलं. काही मंत्री गेले, पण सत्ताधारी पक्षातील लोक बोलत आहेत. यातील काय सुरू आहे मला माहिती नाही. यांचे प्रत्यक्ष प्रस्ताव आणि चर्चा काय होती हे माहिती नाही.


इतर महत्वाच्या बातम्या