अहमदनगर अजित पवारांनी (Ajit Pawar) पंतप्रधान मोदींनी (PM Modi)  शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केल्यानं त्याचा फटका बसल्याचे  वक्तव्य फेटाळले आहे.  शरद पवारांवर बोलू नका अशी विनंती अजित पवारांनी मोदींना केल्याच्या चर्चांचा देखील त्यांनी इन्कार केला आहेय  एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी त्यांच्याशी एक्स्लुझिव्ह संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य फेटाळले आहे. 

Continues below advertisement

अजित पवार म्हणाले,  मी असं काही बोललो नाही. मी असे काही बोलल्याचा व्हिडीओ दाखवा. मागे देखील असच माझ्या नावावर खपवण्यात आलं की मी बहुरूपी बनून दिल्लीला जात होतो. मी त्यांना म्हणालो की सीसीटिव्ही व्हीडीओ दाखवा. पण त्यांनी पुरावा दिला नाही. आम्हाला राज्यांत फटका बसला कारण संविधान मुद्दा, अल्पसंख्याक बाजूला गेला त्याचा फटका बसला. 

आर्थिक शिस्त पाळणाऱ्या दादांनी अचानक एवढ्या योजनांना पैसा दिला कसा यावर अजित पवार म्हणाले, राज्याची आर्थिक स्थिती व्यवस्थित आहे. राज्याचं स्थूल उत्पन्न 43 लाख कोटी रुपये आहे. या उत्पन्नावर आपण किती कर्ज काढू शकतो हे ठरतं. जे आता योजनांसाठी निधीची तरतूद केली ती आरबीआयने घालून दिलेल्या नियमानुसार केली आहे. आम्ही घेतलेले निर्णय फार विचारपूर्वक घेतले आहेत. अर्थिक स्त्रोत वाढवण्याची देखील तयारी केली आहे. जीएसटी उत्पन्न 30 ते 40 हजार कोटीने वाढलं आहे. केंद्रातून देखील जास्तीत जास्त निधी आम्ही आणत आहोत. टॉयोटो किर्लोस्कर, जिंदाल अशा कंपनींचे 40 हजार कोटींचे प्रकल्प राज्यात येत आहेत. अशी आर्थिक व्यवस्था आम्ही केलेली आहे. तरी देखील आम्हाला विरोधक चुनावी जुमला म्हणत आहेत.

Continues below advertisement

आरोप प्रत्यारोप होतात पण फार काही त्यातून निघत नाही: अजित पवार

परमबीर सिंह यांनी अनील देशमुख, जयंत पाटील यांच्यावर केलेल्या आरोपावर अजित पवार म्हणाले, मी माझं मन पक्क केलं आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही कुठलेही प्रश्न विचारले तरी मी विकासावर बोलणार आहे. मला अशा प्रश्ननांच्या खोलात जायचं नाही. कारण केवळ आरोप प्रत्यारोप होतात. फार काही त्यातून निघत नाही. त्यामुळे माझी याबाबत नो कॉमेंट्स...

राज्यसभेची जागा राष्ट्रवादीच लढणार : अजित पवार 

राज्यसभेची जागाही राष्ट्रवादीच लढेल असं त्यांनी स्पष्ट केलंय. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सातारा जिल्ह्यात आपला खासदार आहे, भाजपसाठी आपण जागा सोडली त्यामुळे आता राज्यसभेची जागा राष्ट्रवादीच लढेल अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.  अजित पवार म्हणाले,  आम्ही लोकसभेला भाजपला सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून आमचा त्या जिल्ह्यात खासदार आहे. घड्याळ चिन्हावर कायम खासदार आहे. आम्ही भाजपसाठी जागा सोडली. आम्हाला पियूष गोयल जागा देण्याचं कबूल केलं आहे. आम्ही ती जागा लढवणार आहोत. कोण त्या ठिकाणी लढेल हे आमचे पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल. 

Video : बैठकीत मी असे काही बोललो नाही : अजित पवार 

हे ही वाचा :

आरक्षणाच्या मुद्द्यावर हालचालींना वेग; मराठा- ओबीसी प्रश्नावर पुन्हा सर्वपक्षीय बैठक बोलवणार,अजित पवारांची Exclusive माहिती