अहमदनगर मराठा - ओबीसी (Maratha - OBC)  प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा बैठक बोलावण्याचा निर्णय घेतलाय अशी एक्स्लुझिव्ह माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar)  एबीपी माझाला दिलीय. एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी अजित पवारांशी एक्स्लुझिव्ह संवाद साधलाय. आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी याआधी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. आता मुख्यमंत्र्यांनी पुन्हा बैठक बोलावण्याचा निर्णय घेतलाय असं ते म्हणाले. राज्यसभेची जागाही राष्ट्रवादीच लढेल असं त्यांनी स्पष्ट केलंय. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सातारा जिल्ह्यात आपला खासदार आहे, भाजपसाठी आपण जागा सोडली त्यामुळे आता राज्यसभेची जागा राष्ट्रवादीच लढेल अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.  


मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत नुकतीच एक बैठक पार पडली. रात्री दीडपर्यंत बैठक चालली. गाव खेड्यातील महायुतीचा कार्यकर्त्यांचा समनव्य राहावा यासाठी 6 विभाग आणि मुंबई एक वेगळा विभाग या 7 विभागात आमचे एकत्रित मेळावे पार पडणार आहेत. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या मेळाव्याला हजर असतील. 17 तारखेला आम्ही पुण्यात एक कार्यक्रम घेतोय. त्याच कार्यक्रमात महिलांना खात्यावर पैसे जमा होतील. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात मेळावे पार पडणार आहेत, असे अजित पवार म्हणाले.


मनोज जरांगेंवर अजित पवारांनी उत्तर देणे टाळले



छगन भुजबळ यांना जो नेता प्रचाराला घेऊन जाईल, त्याचा उमेदवार पाडायचा, असं विधान मनोज जरांगेंनी शांतता रॅलीत केलं होतं. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना प्रश्न विचारण्यात आला.   मनोज जरांगे म्हणतात भुजबळ जिथं प्रचाराला जातील ती जागा आम्ही पाडणार आहोत यावर अजित पवारांना उत्तर देणे टाळले आहे. अजित पवार नो कमेंट्स म्हणाले. 


आमचे कार्यकर्ते माझा शब्द मोडणार नाही : अजित पवार


राज्यातील  18 विधानसभा मतदारसंघ असे आहेत जिथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपचा उमेदवारांना पराभूत केलं आहे.  आगामी काळात जर जागा अदलाबदल करण्याची वेळ आली तर करणार का? यावर अजित पवार म्हणाले,   आम्ही महायुती म्हणून एकत्र बसू आणि त्यातून मार्ग काढू. आमचे कार्यकर्ते माझा शब्द मोडणार नाही. असंच भाजप शिवसेना आणि आठवले यांच्याबाबत आहे. आमचा शब्द कार्यकर्ते मोडणार नाहीत. अशी मला खात्री वाटते. 


हे ही वाचा :


'छगन भुजबळ जिथं प्रचाराला जातील ती जागा आम्ही पाडणार', मनोज जरांगेंचं विधान; अजित पवार म्हणाले...