Ajit Pawar on Waqf Amendment Bill: नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची जनसन्मान यात्रा (Jan Samman Yatra) मालेगावात (Malegaon) दाखल झाली आहे. माजी आमदार आसिफ शेख यांची भेट घेतली. तसेच, यावेळी अनेक कार्यकर्तेही उपस्थित होते. मुस्लिम बांधवांच्या भेटीगाठी सुरू आहेत. विविध शिष्टमंडळ येऊन भेटत आहेत. त्याचप्रमाणे वक्फ बोर्डाबाबत केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाबाबत नुकतंच एक शिष्टमंडळ अजित पवारांना भेटुन गेलं. भेटीगाठींनंतर अजित पवारांनी केंद्र सरकारनं वक्फ बोर्ड विधेयक (Waqf Amendment Bill) आणलं आहे, त्यावर भाष्य केलं. ते म्हणाले की, अजित पवारांनी वक्फ बोर्ड विधेयकाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.  


उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "सध्या केंद्रात नवा वक्फ बोर्ड बाबत कायदा आणला जात आहे. मी तुम्हाला विश्वास देतो की, वक्फ बोर्ड कायद्यात काही चुकीच्या गोष्टी घडत असतील, तर मी स्वतः त्याठिकाणी या विषयाबाबत बोलेले. माझ्यासोबत चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील माझ्यासोबत आहेत." 


"सेक्युलर विचारधारा घेऊन आम्ही पूढे जात आहोत. काल कोल्हापूरमढे होतों विशाळगड मधील गजापूर मधील निष्पाप लोकांवर अन्याय करण्यात आला आहे. मी स्वतः तिथं गेलो होतो. तिथल्या कुणाचा दोष नव्हता. निष्पाप लोक होतें. म्हणुन 50 हजार रुपये प्रत्येकी दिले आहेत. त्यानंतर दुसरा हफ्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 50 हजार रुपयांचा हफ्ता दिला आहे. आणि आता त्यांची नुकसान भरपाई म्हणुन दीड कोटी रुपये आम्ही दिले आहेत.", असंही अजित पवार म्हणाले. 


लाडकी बहिण योजनेचे पैसे नेमके कधी येणार? सांगताना अजित दादाच गोंधळले.... 


अजित पवार आज मालेगाव दौऱ्यावर आहेत. मालेगावात बोलताना अजित पवारांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. अजित पवार म्हणाले की, राज्यांत विधानसभा निवडणूका येणारं आहेत. आपण महायुती म्हणुन सामोरे जाणार आहोत. तत्पूर्वी चांगल्या योजना आपण आणल्या आहेत. गरीब घरात जन्माला आलेल्या मुलींसाठी देखील योजना आणल्या आहेत. महिला सबलीकरण करण्यासाठीं योजना आहेत. महायुती घटक पक्षांनी स्वागत केलं. आपलयाला सर्वांना एकोप्याने निवडणुकांना सामोरे जावं लागणार आहे. त्यामुळें आम्ही एकत्रित दौऱ्ये करणार आहोत. घटक पक्षांच्या सर्वांनी एकत्रित काम करायचं आहे यासाठी आवाहन करणार आहे. युतीचं सरकार आलं पाहिजे त्यासाठी नागरिकांनी देखील पाठिंबा दिला पाहिजे."


"राज्यांत महायुतीच सरकार आलं, तर वीज माफी सह सगळ्या योजना आम्ही चालू ठेऊ. जवळपास काही महिने आणि पुढील 5 वर्ष याचा हिशोब काढला तर 1 लाख रुपये मिळणार आहेत. ही रक्कम कमी नाही. इच्छेला मुरड घालावी लागणार आहे. दादा चुकून भाऊबीज बोलले आम्ही 17 तारखेला पैसे देणारं आहोत.", असं अजित पवार म्हणाले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


लाडकी बहीण योजनेचे पैसे नेमके कधी येणार? रक्षाबंधन की, भाऊबीज? अजितदादांच्या वक्तव्या क्षणभरासाठी संभ्रम