Mumbai : देशातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा भाजपकडून (BJP) कायम करण्यात येतो. लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकांनंतर पक्षसंघटना मजबूत करण्यावर सध्या भाजप लक्ष देत आहे. 10 कोटी लोकांना भाजपाशी जोडण्याचं लक्ष पक्षाकडून देण्यात आले आहे. परिणामी भाजप नेत्यापासून ते तळागळातील कार्यकर्ता त्यासाठी जोमाने कामाला लागल्याचे बघायला मिळाले असताना, महायुतीचा (Mahayuti) घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सभासद नोंदणी कार्यक्रमाबाबत काहीसे निरूत्साही असल्याचे बघायला मिळाले आहे. परिणामी अजित दादांनी (Ajit Pawar) त्यांच्या पक्षातील आमदार आणि मंत्र्यांना तंबी देत पुढील आठ दिवसांचं टार्गेट दिले असल्याची माहिती पुढे आली आहे.
तुम्हाला पक्षामुळे आमदारकी-खासदारकी मिळालेय लक्षात ठेवा- अजित पवार
सभासद नोंदणी कार्यक्रमावरून अजित पवारांचा नाराजीचा सुर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून कळते आहे. त्यामुळे अजित पवारांकडून पुढील 8 दिवसांत नवीन सभासद पक्षाला जोडून घेण्यासाठी डोळ्यासमोर एक आकडा निश्चित करून सदर नोंदणी पूर्ण करून घेण्याच्या सूचना अजित दादांनी त्यांच्या पक्षातील आमदार आणि मंत्र्यांना दिल्या आहेत. यावेळी बोलताना त्यांनी आमदार आणि मंत्र्यांचे कान देखील टोचले असल्याची माहिती पुढे आली आहे. केवळ पक्षामुळेच आमदारकी खासदारकी मंत्रिपद मिळत असतं, त्यामुळे पक्ष वाढीकडे देखील प्रामुख्याने लक्ष द्या आणि जास्तीत जास्त नवीन सभासद पक्षाला जोडून घ्या. अशी तंबी ही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावेळी दिली आहे.
मुंबईतील देवगिरी निवासस्थानी आमदार आणि मंत्र्यांच्या पार पडलेल्या बैठकीत अजित पवारांनी या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अजित दादांच्या शब्द आता तरी आमदार मंत्री आणि कार्यकर्ते कितपत पाळतात आणि पक्षाला अधिक बळकटी मिळवून देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पुण्यातील एमपीएससी विद्यार्थीनी घेतली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना EWS व SEBC यांच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी MPSC विद्यार्थ्यांनी भेट घेतली आहे. परीक्षासाठी तांत्रिक अडचणीचे दिवस वगळून 45 दिवसांचा पूर्ण अवधी द्यावा, या मागणीसाठी निवेदन यावेळी दिले आहे. कम्बाईन जागा वाढीसंदर्भात सामान्य प्रशासनाच्या सचिव यांच्याशी सुद्धा सकारात्मक चर्चा केली. यावेळी विद्यार्थी सोबत राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्त्या रूपाली पाटील उपस्थितीत होत्या.
इतर महत्वाच्या बातम्या