पुणे : शरद पवार (Sharad Pawar)  धादंत खोटं बोलत आहेत असा गंभीर आरोप अजित पवारांनी केलाय. 2004 ला कुणीच नवखं, अननुभवी नव्हतं असं अजित पवारांनी (Ajit Pawar)  म्हटलंय. 2004 मध्ये नेते नवखे असल्यामुळे मुख्यमंत्रीपद नाकारलं असं पवार म्हणाले होते. अजित पवारांनी ते विधान फेटाळून लावलंय. 1991  मध्येच पद्मसिंह पाटील मुख्यमंत्री होणार होते, मात्र सुधाकरराव नाईक पवारांचं ऐकत नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री आपलं ऐकणार नाहीत अशी भीती पवारांना होती असं अजित पवार म्हणाले. ते मुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत बोलत होते.  


अजित पवार म्हणाले,  शरद पवार यांनी 2004 बाबत जे सांगितलं ते धादांत खोट आहे. मला त्यावेळी वाटत होतं की, भुजबळ मुख्यमंत्री होतील. त्यावेळी मी मुख्यमंत्री होण्यासाठी इंटरेस्टड नव्हतो. आपण 2004 साली मुख्यमंत्र्यांची संधी होती. आता आपले वरिष्ठ जे सांगत आहेत की त्यावेळी काहीजण नवे होते. तसं काही नव्हतं. 1991 साली शरद पवार यांना संरक्षण मंत्री व्हाव लागलं त्यावेळी पद्मसिंह पाटील मुख्यमंत्री पदासाठी नाव देण्यात आलं होतं.  माञ मध्येच सुधाकरराव नाईक यांचं नाव देण्यात आलं. त्यावेळी शरद पवार यांचं एक वर्ष सुधाकरराव नाईक यांनी ऐकलं नाही.  2004 साली प्रफुल पटेल आणि शरद पवार यांना वाटलं असेल की आपलं आधीच कोणी ऐकलं नव्हतं त्यामुळं आता पुन्हा मुख्यमंत्री केलं तर आपलं कोण ऐकणार नाही, असं काहीतरी असेल 


साताऱ्याची राज्यसभेची जागा  साताऱ्यालाच मिळेल : अजित पवार 


साताऱ्याची राज्यसभेची जागा  साताऱ्यालाच मिळेल असं अजित पवारांनी म्हटलंय. वाईत प्रचारसभेत अजित पवारांनी आमदार मकरंद पाटलांचे भाऊ नितीन पाटील यांना खासदार नाही केलं तर पवारांची औलाद सांगायचो नाही असं वक्तव्य केलं होतं.  अजित पवर म्हणाले,  प्रत्येकाला मानसन्मान हवा असतो. कार्यकर्ता महत्त्वाचं असतो. लोक देतील तो कौल मान्य करून आपण पुढं जायला हवं. अशी भूमीका सर्वांनी मान्य करायला हावी. आपण वेगळा निर्णय घेतल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. मागचा वेळी 41 जागा भाजप युतिच्या होत्या तर विरोधक 7 जागेवर होतें. त्यामुळं आपल्याला यांदा जागा कमी मिळाल्या. सातारची जागा जरी आपण दिली असली तरी आता त्या बदल्यात मिळणारी जागा सातारला देण्यात येणार आहे. ही सर्वांनी नोंद घ्यावी. सातारची राज्यसभेची जागा आपण सातारला देणारं आहोत. इतराणी मागणी करू नये. 


मुलाने अपघात केला त्याच्या बापाला त्याच्या बापाच्या बापाला देखील ताब्यात घेतलं : अजित पवार 


अनधिकृत होर्डिंग्ज अपघात झाला अनेक निष्पाप लोकांचा जीव गेला. डोंबिवलीमध्ये देखील असेच काहीसे झालं. त्याबाबत काळजी घ्यावी अनधिकृत कामाबाबत मी निर्देश दिले आहेत. कुणालाही न वाचवता करवाई करा. ज्या मुलाने अपघात केला त्याच्या बापाला ताब्यात घेतलं त्याच्या बापाच्या बापाला देखील ताब्यात घेतलं आहे. पोलीस तपास करत आहेत काळजी नसावी. आम्ही सरकार म्हणून पूर्ण जबाबदारी घेतली आहे. पोलीस, डॉक्टर, सस्पेंड केले आहेत. सगळ्या कामात लक्ष घातलं गेलं आहे, असे अजित पवार म्हणाले.  


अजित पवारांची संजय राऊतांवर टीका 


रोज सकाळी साडे नऊ- दहा वाजता भोंगा वाजतो आणि त्याला कोणीतरी उत्तर देतं जातीपातीचे मुद्दे लावून धरतात. प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांनी उल्लेख केला त्यानुसार काही झालं तरी  शाहू फुले आंबेडकर विचारधारा आपण सोडणार नाही. मी स्वतः जे पी नड्डा, अमित शाह यांना सांगितलं होतं की, आम्ही विचारधारा सोडणार नाही. आम्ही केवळ विकासाच्या मुद्द्यावर आपल्यासोबत आलो आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासुन देश बचाव संविधान बचाव रॅली काढली होती. त्यावेळी मी मोर्चात सहभागी लोकांना विचारल की संविधान बचाव मुद्दा कुठून आला तर मला एकाने सांगितलं की तसं नरेटीव्ह सेट करायचं असतं. आता देखील असच झालं आहे. अरे कसं काय संविधान बदलणार तुम्ही सांगा. शिवसेनेवर टोकाची भूमीका घ्या शिवसेनेला ठोका असं मला महाविकास आघाडीत असताना सांगितलं. मी विचारलं असं का तर मला त्यावेळी सांगण्यात आलं की शिवसेनेला बोलले की मुस्लिम समाजाला बरं वाटतं आणि आता मुस्लिम समाज शिवसेनेला मतदान करत आहे. आता काय निकाल लागेल हे ब्रह्मदेव देखील सांगू शकत नाही, असे अजित पवार म्हणाले.  


Video :