Ajit Pawar Speech, Shirur : "दिलीपराव वळसे पाटलांचा शपथविधी झाला की, याची सटकली. हा म्हणाला दादांनी याला मंत्रीमंडळात घ्यायला नको होते. आता आपलं काही जमणार नाही. त्यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला बसलेल्या आमदारांना त्यांनी सांगितलं. मला त्या आमदारांनी घरी आल्या आल्या सांगितले की, ते असं म्हणत होता आणि नंतर तो तिकडे गेला. त्याला गाजर दाखवण्यात आलं आहे. त्याला साहेबांनी सांगितलं की, पुढच्या वेळेस तुच मंत्री होणार आहे. आता पुढच्या वेळेस मंत्री होण्यासाठी त्याने कारखान्याची वाट लावली, बाकीच्या सगळ्यांची वाट लावली. आता मंत्री व्हायला निघालायस, पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो", असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिरुरचे आमदार अशोक पवार यांना आव्हान दिले आहे. महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांनी सभा घेतली. यावेळी ते बोलत होते. 


तुमचे प्रश्न केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित सोडवू शकते


अजित पवार म्हणाले, घोडगंगा कारखाना अडचणीत आहे. त्यातून मार्ग काढता येऊ शकेल.  मात्र संचालक मंडळ एकत्रित हवे.अमोल कोल्हे सेलिब्रेटी आहेत, असं सांगून पाच वर्षांत लोकांकडे गेले नाहीत. तुमचे प्रश्न केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित सोडवू शकते. शरद पवारांनी शिरुरचे आमदार अशोक पवार यांना मंत्रिपदाचे गाजर दाखवलय, त्यामुळे ते आपल्यासोबत आले नाहीत.  अजित पवाराने जर ठरवलं तर एखाद्याला आमदार नाही म्हणजे नाही होऊ देत.  तुझी औकात काय आहे ? असं म्हणत अजित पवारांनी अशोक पवारांना दम देण्याचा प्रयत्न केला आहे. 


मी त्यांना कांदा बंदी उठवणे कसे  गरजेचे आहे हे सांगितले


पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, पंतप्रधान पुण्यात सभेला आले होते. एकनाथ शिंदे त्यावेळी भाषणाला उठले आणि मी लगेच त्या खुर्चीवर जाऊन बसलो.  गप्पा मारायला सुरुवात केली.  गप्पा म्हणजे गावाकडच्या गप्पा नव्हत्या. मी त्यांना कांदा बंदी उठवणे कसे  गरजेचे आहे हे सांगितले.  त्यानंतर महाराष्ट्रात कांदा बंदी उठली. अशोक पवारला कारखाना चालवता येत नाही आणि आमच्यावर पावत्या फाडतो, असंही अजित पवार यांनी सांगितले. 




इतर महत्वाच्या बातम्या 


Baramati Lok Sabha : मतदान झालं, मात्र निकालापूर्वीच खापर फोडाफोडी, सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार, कोण जिंकणार?