Ajit Pawar Oath as Deputy Chief Minister of Maharashtra : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आज (दि.12) सहाव्यांदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडतोय. यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीये. तर एकनाथ शिंदे यांनी देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. विशेष म्हणजे या अजित पवार यांनी महाराष्ट्राचे सहाव्यांदा उपमुख्यमंत्री होण्याची विक्रम केला आहे. महायुतीच्या शपथिविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राज्यांचे प्रमुख देखील उपस्थित होते. याशिवाय, अनेक सेलिब्रिटींनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली.
अजित पवारांचा आजपर्यंतचा प्रवास
बारामती विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त.
सदस्य वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्था, पुणे
रयत शिक्षण संस्था, सातारा संचालक
महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष – ऑगस्ट 2006 ते 19 ऑगस्ट 2018.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष – सप्टेंबर 2006 पासून
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन – मार्च 2013 पासून
सेवादास संचालक : महानंद आणि महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन - सप्टेंबर 2005 ते मार्च 2013 आणि 25 नोव्हेंबर 2018 पासून अध्यक्ष म्हणून काम करत आहे
पूर्वीच्या विधानसभा / विधानपरिषद / लोकसभा / राज्यसभेचे सदस्य आणि संसद सदस्य / समिती प्रमुख म्हणून केलेले काम (कार्यकाळात)
लोकसभा सदस्य : जून 1991 ते सप्टेंबर 1991
विधानसभा सदस्य : 1991 ते 1995, 1995 ते 1999, 1999 ते 2004, 2004 ते 2009, 2009 ते सप्टेंबर 2014, 2014 ते 26 सप्टेंबर 2019. २०१९ ते २०२४
राज्य/केंद्रीय मंत्री/राज्यमंत्री म्हणून केलेले काम (कार्यकाळात)
कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री: जून 1991 ते नोव्हेंबर 1992
पाणीपुरवठा, ऊर्जा आणि नियोजन राज्यमंत्री: नोव्हेंबर 1992 ते फेब्रुवारी 1993
पाटबंधारे मंत्री (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे), फलोत्पादन : ऑक्टोबर 1999 ते जुलै 2004
ग्रामीण विकास, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, पाटबंधारे मंत्री (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळ): जुलै २००४ ते नोव्हेंबर २००४
जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे पाटबंधारे वगळून), जलसंपदा आणि स्वच्छता : नोव्हेंबर २००४ ते नोव्हेंबर २००९.
जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे वगळून), ऊर्जा : नोव्हेंबर २००९ ते नोव्हेंबर २०१०
उपमुख्यमंत्री (वित्त, नियोजन आणि ऊर्जा): नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2012
उपमुख्यमंत्री (वित्त, नियोजन आणि ऊर्जा): डिसेंबर 2012 ते सप्टेंबर 2014
उपमुख्यमंत्री : 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2019
उपमुख्यमंत्री : 30 डिसेंबर 2019 ते 29 जून 2022
विरोधी पक्षनेते : ४ जुलै 2022 ते ३० जून 2023
उपमुख्यमंत्री : २ जुलै 2023 ते 26 नोव्हेंबर 2024
अजित अनंतराव पवार यांचे प्रोफाइल
नाव : अजित अनंतराव पवार
जन्मतारीख:22 जुलै 1959
जन्मस्थान: देवळाली प्रवरा, राहुरी तालुका, अहमदनगर जिल्हा
शिक्षण: बी.कॉम
ज्ञात भाषा: मराठी, हिंदी, इंग्रजी
व्यवसाय: शेती
पत्नीचे नाव: पत्नी - सौ.सुनेत्रा अजित पवार
मुले: २
मुलगे - पार्थ आणि जय
इतर महत्त्वाच्या बातम्या