Arunachal Pradesh Results : लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल्स समोल आले आहेत. त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भोपळाही फोडता येत नाहीये. अजित पवारांनी महाराष्ट्रात लोकसभेच्या 4 जागा लढवल्या होत्या. तर महायुतीत वाट्याला येणारी एक जागा रासपच्या महादेव जानकर यांना देण्यात आली होती. मात्र, एक्झिट पोलमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळताना दिसत नाहीये. रायगड आणि बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळेल, अशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आशा आहे. दोन्ही मतदारसंघात अजित पवारांनी चांगलाच जोर लावलाय. शिवाय बारामती खुद्ध अजित पवार यांच्या पत्नी उमेदवार असल्याने निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करता आली नसली तरी अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे काही उमेदवार विजयी झाले आहेत.
लोकसभा निवडणुकीबरोबरच अरुणाचल प्रदेश आणि सिक्किम विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या. दोन्ही विधानसभांची मुदत संपल्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही राज्यात निवडणूका जाहीर केल्या होत्या. त्यामुळे अरुणाचल प्रदेशमधील 60 जागांसाठी मतदान पार पडले होते. 60 पैकी 41 जागांवर भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळवलाय. दरम्यान, आणखी काही जागांवर देखील भाजप आघाडीवर आहे, त्यामुळे भाजपच्या विजयी जागांचा आकडा वाढणार आहे. दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या काही जागा अरुणाचल प्रदेशमध्ये निवडून आल्या आहेत. मात्र, बऱ्याच जागांवर निसटता पराभव झाल्याचे चित्र आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमधील 3 जागांवर झेंडा
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अरुणालच प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत एकूण 15 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी यापैकी तीन जण निवडून आले आहेत. तर एक उमेदवार दोन मतांनी पडला आहे. दुसरा उमेदवार 200 मतांनी पडला आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपचे 46 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपने विधानसभेतील आपली सत्ता राखली. मात्र, अजित पवारांचे 3 उमेदवार निवडून आले तर 3 उमेदवार अतिशय थोडक्या मतांनी पडले आहेत.
अजित पवार यांच्या पक्षाचे थोड्या मतांनी पराभूत झालेले उमेदवार -
नामसांग विधानसभा मतदार संघ -
नगोंगलीन बोई - 56 मतांनी पराभूत
---------
खोणसा पश्चिम विधानसभा मतदार संघ -
यांग सेन माटे - 804 मतांनी पराभूत
---------
पक्के केसांग विधानसभा मतदार संघ -
टेकी हेमू - 813 मतांनी पराभूत
इतर महत्वाच्या बातम्या
Latur Lok Sabha Result 2024 : लातूर लोकसभा मतदार संघात बाजी कोण मारणार? कॉंग्रेस की भाजप? वाचा लोकसभेचा निकाल एका क्लिकवर...