Nitesh Rane : देशाच्या जनतेने मतदानाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना (PM Modi) बहुमत दिलं आहे. जो काही देशाच्या आणि मोदींच्या विरोधात प्रचार केला गेला, तो जनतेने नाकारला असल्याची प्रतिक्रिया भाजप आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. कालच्या एक्झिट पोलच्या संदर्भात राणे बोलत होते. आपल्या बाजूने एक्झिट पोल आले नाही तर ते फ्रॉड ठरवायचे असं म्हणत राणेंनी संजय राऊतांना प्रतिउत्तर दिलं. राणेंना एक्झिट पोलची गरज नाही. मतदान झालं तेव्हाच आम्ही विनायक राऊत यांची भाकरी परतली आहे. या मतदारसंघात राणेंना मतदारांनी कौल दिला आहे. 4 जुन हे औपचारिकता असल्याचे नितेश राणे म्हणाले.


मोदींनी ध्यान केल्यामुळं  विरोधकांच्या बुडाखाली आग


उद्धव ठाकरेंना बेस्ट मुख्यमंत्री अवॉर्ड देणाऱ्या कंपन्यांनी आपल्या कंपन्यांना टाळ लावला का? त्या कंपन्या 420 होत्या का? पैसे देऊन अवॉर्ड द्यायचे का? कसा प्रश्न संजय राऊत यांना राणेंनी केला. मोदींनी ध्यान केल्यामुळं  विरोधकांच्या बुडाखाली आग लागली आहे. उद्धव ठाकरे भोंदू बाबांना घेऊन फिरतात, सहा सहा महिने जेवणात मीठ टाकत नाहीत. काळी विद्या केली तर सत्ता येईल अशी भोंदू बाबांनी उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचे नितेश राणे म्हणाले.


संजय राऊत यांच्यावर लवकरच ऑर्थर रोड जेलमध्ये जाण्याची वेळ येणार


संजय राऊत यांच्यावर लवकरच ऑर्थर रोड जेलमध्ये बेडकांबरोबर डराव डराव करण्याची वेळ येणार आहे. संजय राऊत यांची भांडूपमधून एक्झिट करण्याची वेळ आली अल्याचे नितेश राणे म्हणाले. ज्याला वाटत त्यांना कोकण पदवीधर निवडणुक लढवू शकता. आम्ही महायुती म्हणून या निवडणुकीत सामोरे जावू असेही राणे म्हणाले. 


येत्या 4 जूनला म्हणजे मंगळवारी लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. त्यापूर्वीच काल एक्झिट पोल हाती आले आहेत. टीव्ही 9 पोलस्ट्राट आणि पीपल्स इनसाईट्स एक्झिट पोलनुसार रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे हे आघाडीवर राहण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात त्यांच्यासमोर ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचे आव्हान होते. मात्र, नारायण राणे यांच्या पाठिशी भाजपची मोठी ताकद होती. तसेच नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कणकवलीत सभा घेतली होती. त्यामुळं या निवडणुकीत नारायण राणे विजयी होण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे.


महत्वाच्या बातम्या:


नारायण राणे की विनायक राऊत, कोण बाजी मारणार? 14 टेबलवर फेरीनिहाय मतमोजणी होणार!