इंदापूर : इंदापूर येथे तालुका भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा  शुक्रवारी(दि.19) वाघ पॅलेस येथे सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) हे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड. शरद जामदार यांनी दिली.


या मेळाव्यास बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनित्रा पवार उपस्थित राहणार आहेत. बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासंदर्भात अजित पवार व हर्षवर्धन पाटील हे दोन मान्यवर नेते मेळाव्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तरी  या मेळाव्यास भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशी आवाहन तालुकाध्यक्ष अँड. शरद जामदार यांनी केले आहे. दरम्यान, या मेळाव्यानंतर उपमुख्यमंत्री  अजित पवार, सुनेत्रा पवार आदी पवार कुटुंबातील सदस्य हे भाग्यश्री निवासस्थानी जाऊन हर्षवर्धन पाटील व कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.


भाजपचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय!


इंदापूर तालुक्यातील गावोगावचे भाजपचे कार्यकर्ते हे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 300 पेक्षा अधिक गाड्या घेऊन आज शुक्रवारी (दि.18) सकाळी पुणे येथे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले होते. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भारतीय भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत, अशी माहिती इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टी कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांनी दिली.


काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याला उपस्थिती लावली होती. यावेळी फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची समजूत काढली होती. अनेक वर्ष एकमेकांशी संघर्ष केल्यानंतर प्रतिस्पर्ध्याशी जुळवून घेणे अवघड असते. या सगळ्याची कल्पना असल्यामुळे मी अजित पवार यांना सोबत घेण्यापूर्वी हर्षवर्धन पाटील यांना सगळ्याची कल्पना दिली होती. तुम्हाला मतदारसंघात विरोधाला आणि प्रश्नांना सामोरे जावे लागेल, याची कल्पना त्यांना दिली होती. पण आपल्या पंतप्रधान मोदींसाठी हा निर्णय करायचा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. 


आणखी वाचा


बापासमोर लेक म्हणाली, विधानसभेचं काय? फडणवीस म्हणाले 2019 मधील हर्षवर्धन पाटलांचा पराभव आमच्याही जिव्हारी