Congress President Election: काँग्रेसने नेते राहून गांधी हे सध्या पक्षाच्या भारत जोडो यात्रेत व्यस्त आहेत. अशातच पक्षात त्यांना पुन्हा अध्यक्ष करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राजस्थान आणि दिल्ली राज्य समित्यांनंतर आज छत्तीसगड काँग्रेसनेही राहुल गांधींना पक्षाध्यक्ष बनवण्याचा ठराव मंजूर केला आहे. शनिवारी हा ठराव जयपूर आणि दिल्लीतही मंजूर झाला. राहुल गांधींचे मन वळवण्याच्या काँग्रेसच्या या शेवटच्या रणनीतीची बातमी सर्वप्रथम एबीपी न्यूजने दिली होती. प्रदेश काँग्रेस कमिटीने काँग्रेसच्या भावी अध्यक्षांना प्रदेशाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि एआयसीसीमध्ये प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्याचे अधिकारही दिले आहेत. पक्षाच्या राज्य मुख्यालय राजीव भवन येथे झालेल्या बैठकीत हे दोन्ही ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. बैठकीनंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, त्यांनी राहुल गांधींना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.


भूपेश बघेल म्हणाले की, राहुल गांधी यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावर पुन्हा बसवण्याचा प्रस्ताव मी ठेवला आहे. एआयसीसीचे अध्यक्ष राहुल गांधी यांना करावे, असे प्रस्तावित करण्यात आले आहे. मोहन मरकम यांनी एआयसीसी (AICC) शिष्टमंडळ, प्रदेशाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांना कार्यकारिणीच्या स्थापनेसाठी अधिकृत करण्याचा प्रस्ताव मांडला. यालाही पाठिंबा देण्यात आला असून दोन्ही ठराव एकमताने मंजूर करण्यात आले आहेत.


राजस्थान काँग्रेस कमिटीकडूनही प्रस्ताव ठेवण्यात आला 


भपेश बघेल म्हणाले की, अध्यक्ष मोहन मरकम यांना हा प्रस्ताव अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) रिटर्निंग ऑफिसर मधुसूदन मिस्त्री यांच्याकडे नेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव राजस्थान काँग्रेस कमिटीकडून आला आहे. छत्तीसगड हे दुसरे राज्य आहे जिथून हा प्रस्ताव जात आहे. असे प्रस्ताव इतर राज्यांतील समितींकडूनही येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्याचा विचार करावा लागेल.


जी-23 नेत्यांची वेगळी भूमिका?


काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सुरू होत असले तरी पक्षांतर्गत सुरू असलेला गोंधळ अजूनही शांत होताना दिसत नाही. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्याशिवाय मनीष तिवारी, आनंद शर्मा आणि भूपेंद्र हुडा यांसारखे G-23 नेते पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, काँग्रेसने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार 22 सप्टेंबर रोजी पक्षाध्यक्ष निवडीची अधिसूचना जारी झाल्यानंतर 24 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.