Paithan: छत्रपती संभाजीनगर येथे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात झालेल्या आंदोलनानंतर आज पैठणच्या दौऱ्यातही आदित्य ठाकरेंचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला आहे. आदित्य ठाकरे यांच्या रॅलीमध्ये एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजीही करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असून त्यांचे निवेदन स्वीकारून आम्ही तुमच्या सोबत आहोत असं त्यांनी आंदोलकांना सांगितलंय.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये शहरात मोठ्या संघर्ष पाहायला मिळाला. दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने गदारोळ झाला होता. लाठी चार्जही करण्यात आल्याने तणावाचे वातावरण होते. दरम्यान पैठणमध्ये गेले असता मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत आदित्य ठाकरेंचा ताफा अडवला असून मोठ्या प्रमाणात जमाव एकत्रित झालाय.
ताफा अडवत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी
मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापलेला असताना शहरात आलेल्या नेत्यांना अडवत मराठा आंदोलक घोषणाबाजी करताना दिसत आहेत. धाराशिव जिल्ह्यातही राज ठाकरेंच्या दौऱ्यात मराठा आंदोलकांनी राडा केला होता. त्यानंतरही अनेक नेत्यांच्या दौऱ्यात अशा स्वरूपाची घोषणाबाजी केल्यानंतर आदित्य ठाकरेंचा ताफा पैठणमध्ये मराठा आंदोलकांनी अडवला. एक मराठा लाख मराठा अशा घोषणाबाजी करत मराठा आरक्षण प्रश्न त्यांनी आदित्य ठाकरे यांना निवेदनही दिले. यावेळी मोठा जमाव एकत्रित झाल्याच दिसलं. ताप अडवल्याने शहरात काही वेळ गोंधळाचे वातावरण होते. पण पोलीस बंदोबस्त असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात होती.
आदित्य ठाकरेंनी स्वीकारले निवेदन
मराठा आरक्षणाच्या मागणीचे निवेदन स्वीकारत आदित्य ठाकरे यांनी घेराव घातलेल्या मराठा आंदोलकांना आम्ही तुमच्या सोबत आहोत असे आश्वासन दिलं आहे. यावेळी कारमधून बाहेर येत त्यांनी मराठा आंदोलकांना समजावल्याचे दिसले. यावेळी मोठा जमाव एकत्रित दिसून आला होता. पोलिस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात होता. एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी आदित्य ठाकरेंचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवल्यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण होते. मात्र, आदित्य ठाकरेंनी मराठा आंदोलकांनी दिलेले निवदन स्विकारत त्यांना आम्ही तुमच्या सोबत असल्याचे सांगितल्याचे दिसले.
भाजप- शिवसैनिकांमध्ये जोरदार राडा
छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे आले असता त्यांच्या दौऱ्याला भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. भाजप कार्यकर्त्यांनी मोदी मोदी अशा घोषणा देत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आव्हान दिले. या विरोधाला प्रतिउत्तर देत शिवसैनिकांनी देखील उद्धव ठाकरे जिंदाबाद च्या घोषणा दिल्या. घोषणाबाजीने वातावरण अधिकच तापले व दोन्ही गट एकमेकांवर धावून गेले. या घटनेत कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. काही कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याने परिस्थिती अधिकच चिघळली.
हेही वाचा: