मुंबई : राज्यातील मिंधे गँग, भाजप, अजित पवार राष्ट्रवादीमधून अनेक जण बाहेर पडतील, असं वक्तव्य आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलं आहेत. हे सरकार फक्त सहा महिन्यांचं आहे,  नोव्हेंबरला आपल्याला आपलं सरकार बसवायचं आहे, ही निवडणूक नांदी आहे, ही फक्त सुरुवात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. खासदारांना सोडायचं नाहीय, त्यांच्याकडून मोठी विजय मेळावा करुन घ्यायला आहे, पण खासदार आणि आमदार मिळून विजय मेळावा साजरा करु, असं त्यांनी म्हटलंय. मुंबई दक्षिण मतदारसंघाच्या बैठकीनंतर संबोधन करताना आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे. 


ही निवडणूक सहज जिंकणे शक्य


आदित्य ठाकरे म्हणाले की, खासदारांकडून मोठा विजय मेळावा करायचा आहे, पण दोन आमदारसोबत घेऊन मेळावा करु. भायखळामध्ये मोठा लीड मिळाला.
मुंबईत एक सिट गडबड झाली. फ्रॉड झाला, ती लढाई सुरू आहे. निवडणूक आयोग भाजप ऑफिसमधून चालत, हे कळणार आहे. योगायोगाने आशिर्वादाने एक नंबर मिळाला. मी पण अंगावर केस घेतलेल्या आहेत. ही निवडणूक सहज जिंकणे शक्य आहे. आपण जास्तीत जास्त नोंदणी आपण केली आहे. गडबड लोकसभेत झाली. एक कोणाचं मेव्हणा मोबाईल आत नेऊ शकतो, त्याला आत टाकायचे आहे. 


रिल मंत्री की, रेल मंत्री, हेच कळत नाही


आजपासून आपल्याला जबादाऱ्या वाटून घ्यायच्या आहेत. जास्त जबाबदाऱ्या घेऊ नका, फक्त नोंदणी करा. जास्त जबाबदाऱ्या घेणारे लोक मोठे असतात. आजच केंद्रीय रेल्वे मंत्री यांना भाजपने प्रभारी बनवलं. ज्या मंत्र्यांच्या अखत्यारित एवढं मोठं रेल्वे खातं येते, गेल्या 6 ते 8 महिन्याच इतके रेल्वे अपघात झाले आहेत. आज सकाळी एक रेल्वे अपघात झाला, पण हे फक्त वंदे भारतचे फोटो टाकत असतात. बाकी काम शून्य. रिल मंत्री की, रेल मंत्री हेच कळत नाही. ना धड रेल्वे खातं सांभाळू शकतील, ना भाजप सांभाळू शकतील.


नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?


हे सरकार फक्त सहा ते आठ महिनेच आहे. ज्यांना-ज्यांना वाटतं आहे, मिंद्ये सरकारने घोळ केला आहे, ते बाहेर पडतील, महाराष्ट्र प्रेमी बाहेर पडतील, अनेक खासदार बाहेर पडतील. भाजपची पार्लिमेंट्री मिटींग झाली नाही, इंडिया आघाडीची झाली. जे दोन मित्र पक्ष आहेत त्यांना सांगतो, स्पीकर तुमचा बनवा, नाहीतर भाजप चा स्पीकर झाल्यास पहिला तुमचा पक्ष फोडतील. प्रियांका गांधी यांनी चांगला प्रचार केला, चांगली कामे केली आहेत. राज्यातील मिंधे गँग, भाजप, अजित पवार राष्ट्रवादीमधून अनेक जण बाहेर पडतील. जे गद्दार आहेत, पक्ष चोर आहेत, त्यांना आम्ही पुन्हा घेणार नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.