Aaditya Thackeray : त्यांच्यावर काही बोलणार नाही, सामान्य नागरिक उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) आहेत. प्रामाणिक लोक उद्धव ठाकरेंसोबत आहेत. दिल्लीसमोर झुकणाऱ्याला आम्ही सत्तेत बसू देणार नाही, हाच आमचा प्रयत्न आहे. देशात सगळीकडे अस्थिरता आहे. जिथे जिथे भाजपच सरकार तिथे अस्थिरता आहे. जेवढे तेवढेच महत्त्व द्यायचं असतं, असा टोला आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी बबनराव घोलपांना (Babanrao Gholap) लगावला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, एकंदर वातावरण सगळीकडे चांगले आहे. सगळ्यांना हेच पाहिजे की महाराष्ट्र हिताचे कोणी बोलणारे हवे. त्यासाठी आमच्या सभांना गर्दी होत आहे. लोक आशीर्वाद द्यायला येत आहेत, असे त्यांनी म्हटले.
प्रामाणिक लोक आमच्यासोबत
बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. येत्या दोन दिवसात ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. सामान्य नागरिक हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. प्रामाणिक लोक आमच्या सोबत आहे. जेवढे तेवढेच महत्त्व द्यायचं असते, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
दिल्लीसमोर झुकणाऱ्याला आम्ही सत्तेत बसू देणार नाही
आमचा प्रयत्न हाच आहे की, दिल्लीसमोर झुकणाऱ्याला आम्ही सत्तेत बसू देणार नाही. आपण पाहत असाल सगळीकडे अस्थिरता आहे. प्रत्येक राज्यात अस्थिरता आहे. भाजपप्रणीत राज्यात अस्थिरता आहे. आम्हाला स्थिर सरकार महाराष्ट्राला द्यायचे आहे. महाविकास आघाडीत चांगले काम सुरु होते. तेच काम आम्ही करू, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
दिल्ली बंद करण्यापेक्षा दिल खोलो और बात करो
दिल्लीतील शेतकरी आंदोलन हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. देशाच्या बोर्डरवर जसे खिळे लावले आहेत. तसेच दिल्लीला लावण्यात आले आहेत. ते कोणाच्या विरुद्ध तर अन्नादात्याच्या विरुद्ध. अर्थमंत्री जेव्हा अर्थसंकल्प सादर करत होत्या तेव्हा त्यांनी सांगितले की, चार महत्वाच्या जातींवर आता पुढच्या वर्षी लक्ष देणार आहे. प्रत्येक वर्ग सरकारवर नाराज आहे. मग तुम्ही दहा वर्ष नेमके केले तरी काय? आज कृषी प्रधान देश आपण बोलतो पण शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला जात आहे. दिल्ली बंद करण्यापेक्षा दिल खोलो और बात करो, असेही ते म्हणाले.
आणखी वाचा
मोठी बातमी! माजी मंत्री बबनराव घोलप ठाकरे गटाला करणार जय महाराष्ट्र, शिंदे गटाच्या वाटेवर