Aditya Thackeray On Raj Thackeray: गेल्या महिन्यात माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. दोघांनीही सूचक विधानं करत संभाव्य मनोमिलनाचे संकेत दिले. त्यानंतर, दोघेही परदेशात रवाना झाले आणि ठाकरे बंधूंच्या युतीविषयीची चर्चा काहीशी थंडावली. मात्र, आता पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance) यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांना वेग आला आहे. आम्ही सकारात्मक आहोत, असं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून सांगण्यात येत आहे. त्यातच आता माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज ठाकरेंसोबतच्या युतीवर भाष्य केलं आहे. 

Continues below advertisement


आदित्य ठाकरेंना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या संभाव्य युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उद्धव ठाकरेंनी युतीसाठी प्रतिसाद दिला होता. महाराष्ट्र हितासाठी जे कोणी साफ मनाने येतील त्यांना आम्ही सोबत घेऊ, असं आदित्य ठाकरेंनी सांगितले. तसेच आम्ही स्वच्छ दिलाने पुढे येतोय. सेटिंगचं राजकारण करणार नाही. साद-प्रतिसाद, टाळी हे चालूच असते. पण आम्ही महाराष्ट्र हिताचं बोलतोय. जे कोणी सोबत येतील त्यांना सोबत घेऊ. मी कोणत्या एका पक्षाबद्दल बोलत नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. त्यामुळे आता काका राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत आदित्य ठाकरेंनी देखील पुढे पाऊल टाकल्याची चर्चा रंगली आहे.


शिवसेना ठाकरे गटाची आज मुंबईत बैठक-


शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार, खासदार आणि जिल्हाप्रमुखांची आज 17 मे रोजी बैठक होणार आहे. शिवसेना भवन येथे आमदार, खासदार आणि जिल्हाप्रमुख यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी दादर येथील शिवसेना भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. सध्याच्या परिस्थितीवर त्याचप्रमाणे पुढील महिन्यात येणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावली असल्याची माहिती समोर आली आहे. 




संबंधित बातमी:


Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरेंसोबतच्या युतीसाठी उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोडणार?; संजय राऊतांच्या विधानाने चर्चांना उधाण


Sanjay Raut On Eknath Shinde: ईडीकडून अटक होण्याआधी संजय राऊतांना एकनाथ शिंदेचा फोन; म्हणाले, मी अमित शाह यांच्यासोबत...