मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे (Shiv Sena Uddhav Thackeray) आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याविरोधात मनसेने (MNS) पोस्टरबाजी (Poster) केल्यानंतर आता आदित्य ठाकरेंनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पोस्टरबाजी करत वरळी विधानसभेत आदित्य ठाकरेंना पाडण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. आता आदित्य ठाकरेंनी यावर ठाकरे भाषेत तोफ डागली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, मेसी आणि रोनाल्डोच्या विरोधात सगळे मैदानात उभे राहतात. सुपारीबाज पक्षांबद्दल काही बोलणार नाही. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना विरुद्ध मनसे अशी लढत होताना दिसत आहे.
सुपारी बाज पक्षाबद्दल मी काही बोलणार नाही
संदीप देशपांडे यांचा वरळीचे भावी आमदार असा उल्लेख असलेले, "बर्फातला प्राणी बर्फातच पाठवूया, जनमनातला आमदार, संदीप वरळीत आणूया'', अशा आशयाचे बॅनर सध्या वरळीत झळकत आहे. यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. वरळी आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले की, वरळीत जर कोणी उमेदवार उभा राहत असेल, तर राहू द्या. मेसी आणि रोनाल्डोच्या विरोधात सगळे मैदानात उभे राहतात. ये डर अच्छा है. सुपारी बाज पक्षाबद्दल मी काही बोलणार नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
मराठी माणसाला सर्वत्र नाकारलं जातंय
आदित्य ठाकरे म्हणाले, मी काय वक्तव्य करू शकत नाही. पहिले तर सगळ्यांनी विचार केला पाहिजे, मराठी विरुद्ध आणि महाराष्ट्र विरुद्ध कारवाई भाजप यांच्यामध्ये का सुरू झाली. दोन-अडीच वर्षात पाहिलं, उद्योगधंद्यांमध्ये नाकारलं जातं, घर नाकारलं जातं, कुठे एंट्री नाकारली जात आहे. आमच्याच कार्यकर्त्यांना प्रचार करण्याच्या वेळेस सोसायटीमध्ये प्रवेश नाकारला गेला. भाजपच्या राज्यामध्येच यांची हिम्मत का वाढते. महाविकास आघाडीचे सरकार होतं, तेव्हा हे का नव्हतं होतं, हा सगळ्यांनी विचार केला पाहिजे, असंही ठाकरे म्हणाले.
येणारं सरकार महाविकास आघाडीचं असेल
आमच्या वचननाम्यामध्ये सगळं मान्य केलेलं आहे. धनत्रा म्हणून त्यांचे प्रोजेक्ट हेड आहे. जगात कुठच्याही देशात अशा व्यक्तींना जेलमध्ये घातलं आणि सस्पेंड केलं पाहिजे, झालेल्या कामाची चौकशी झाली पाहिजे. त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. मला राजकारणामध्ये जायचं नाही, येणारं सरकार महाविकास आघाडीचं सरकार असणार आहे. जनतेने देखील मत दिलेलं आहे. येणारं सरकार महाविकास आघाडीचच आहे, असा विश्वास यावेळी आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
पाहा व्हिडीओ : काय म्हणाले आदित्य ठाकरे?