Amol Mitkari Banners in Worli : मुंबई : मुंबईतील (Mumbai News) वरळीत (Worli) अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांचे भावी उमेदवार म्हणून बॅनर झळकले आहेत. वरळीत 'घड्याळ'वाला आमदार विजयी व्हावा, असा उल्लेख असलेले बॅनर झळकल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे महायुतीत अजित पवार गट वरळी मतदारसंघावर दावा करणार का? याकडे लक्ष लागलं आहे. दरम्यान, सध्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे वरळीचे आमदार आहेत, तर मनसे वरळीतून संदीप देशपांडे यांना उतरवण्याच्या तयारीत आहे. मिटकरींच्या नावानं वरळीत झालेल्या बॅनरबाजीमुळे राजकीय वर्तुळात काहीसं कुतुहल निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. 


मुंबईतील वरळी भागात अनेक ठिकाणी अमोल मिटकरी यांचे भावी उमेदवार म्हणून बॅनर्स झळकले आहेत. मुंबई राष्ट्रवादीचे सरचिटणीस नागेश मढवी यांच्या नावानं शुभेच्छुक म्हणून हे बॅनर्स झळकले आहेत. अमोल मिटकरींच्या रुपानं एकदा वरळीत 'घड्याळ'वाला आमदार विजयी व्हावा असा उल्लेख बॅनर्सवर करण्यात आला आहे. सध्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे वरळीचे आमदार आहेत. तर मनसे वरळीतून संदीप देशपांडे यांना उतरवण्याच्या तयारीत आहे. मिटकरींच्या नावाने वरळीत झालेल्या बॅनरबाजीमुळे राजकीय वर्तुळात कुतूहल निर्माण झालं आहे. याआधी 2009 मध्ये सचिन अहीर यांच्या रुपानं वरळीतून राष्ट्रवादीचा आमदार निवडून आला होता. सचिन अहिर आता ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत. त्यामुळे वरळीवर राष्ट्रवादीचा अजित पवार गट दावा करणार का? याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.


वरळी विधानसभा मतदारसंघात अमोल मिटकरींची हवा 


आगामी विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. अशातच सध्या मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे आमदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत पहिल्यांदा ठाकरेंच्या कुटुंबातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरून आमदार झाला होता. अशातच यंदाची निवडणूक वेगळी आहे. शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीनंतर पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. अशातच आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी महायुतीनं कंबर कसली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरळी आणि ठाणे विधानसभा मतदारसंघांवरुन जुंपल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच आता मनसे संदीप देशपांडे यांना वरळी विधानसभेतून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरळीत मराठी मतं विभागली जाणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता अजित पवारांनी जर वरळी विधानसभेवर दावा ठोकला, तर मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये वरळी विधानसभेची निवडणूक चुरशीची होणार, यात काडीमात्र शंका नाही. 


पाहा व्हिडीओ : Amol Mitkari Worli Banners : वरळीत घड्याळवाला आमदार विजयी व्हावा; बॅनरवर उल्लेख