Exit Poll 2024 : लोकसभा निवडणुकीबाबत एबीपी आणि सी व्होटर्सचा सर्व्हे समोर आलाय. हा मतदारांच्या वैयक्तिक मतांवर आधारित असलेला एक्झिट पोल आहे. मतदान पार पडल्यानंतर लगेच मतदारांचा कौल जाणून घेण्यात आलाय. 19 एप्रिलला मतदानाचा पहिला टप्पा पार पडला होता. त्यानंतर 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान हा सर्व्हे घेण्यात आलाय. दरम्यान, दक्षिण भारतात कोणत्या पक्षाला आघाडी मिळू शकते, याबाबतचा अंदाज आपण जाणून घेऊयात.. 


महाराष्ट्रात कोणाला आघाडी ? 


एबीपी आणि सी व्होटर्सच्या एक्झिटपोलनुसार , महाविकास आघाडीला 23 ते 25 जागा मिळू शकतात. तर महायुतीला 22 ते 26 जागा मिळू शकतात, असा अंदाज आहे. महाराष्ट्रात दोन पक्ष फुटल्यानंतर होणारी ही पहिली निवडणूक होती. या निवडणुकीत महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 21, काँग्रेस पक्षाने 17 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा लढवल्या होत्या. तर दुसरीकडे महायुतीकडून भारतीय जनता पक्षाने 28, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 15 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 4 जागा लढवल्या होत्या. तर रासपच्या महादेव जानकरांनी परभणीची जागा लढवली होती. 


केरळ आणि तामिळनाडूमध्ये भाजपचं खातं उघडणार ? 


यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष दक्षिणेतही मुसंडी मारताना दिसतोय. दक्षिणेतील राज्यांमध्ये भाजपने विशेष लक्ष दिल्याचे पाहायला मिळाले होते. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यात भाजपला आघाडी मिळू शकते, असा अंदाज आहे. कर्नाटकचा गडही भाजप राखेल, असं एक्झिट पोलमधून समोर आलंय. याशिवाय, तामिळनाडू आणि केरळ राज्यांत भाजप आपलं खातं उघडेल, असं बोलले जात आहे. 


कर्नाटकमध्ये इंडिया आघाडीला फटका? 


कर्नाटकमध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला फटका बसण्याची शक्यता आहे. कारण कर्नाटकातील 28 जागांपैकी 23 ते 25 जागांवर एनडीएला आघाडी मिळू शकते. तर इंडिया आघाडीला 3 ते 5 जागा मिळू शकतात, असा एक्झिटपोलचा अंदाज आहे. त्यामुळे भाजप कर्नाटकातील आपली कामगिरी कायम ठेवेल, असं बोललं जातय. 


आंध्रप्रदेशमध्ये कोणाला किती जागा?


आंध्रप्रदेशमध्ये एकूण जागा 25 आहेत. त्यापैकी एनडीए 21 ते 25 जागा जिंकेल, असा अंदाज आहे. इंडिया आघाडीला आंध्र प्रदेशात खातंही उघडता येणार नाही, असे अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त केला जातोय. 


तेलंगणामध्ये कोण मुसंडी मारणार?


तेलंगणामध्ये एकूण 17 जागा आहेत. एनडीए साधारणत: 7 ते 9 जागा जिंकेल, असा अंदाज आहे. तर इंडिया आघाडीही 7 ते 9 जागा जिंकू शकेल, त्यामुळे दोघांनाही सम-समान जागा मिळतील, असे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. 


तामिळनाडूमध्ये कोणाची सरशी ?


सर्वांत जास्त जागा असणाऱ्या राज्यांपैकी तामिळनाडू हे देखील महत्वाचे राज्य ठरणार आहे. एबीपी आणि सी व्होटर्सच्या सर्व्हेनुसार, इंडिया आघाडीला तामिळनाडूमध्ये 37 ते 39 जागा जागा मिळू शकतात. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला म्हणजेच एनडीएला केवळ 2 जागांवर समाधाना मानवे लागू शकते, असा एक्झिटपोलचा अंदाज आहे.


Disclaimer : सर्वेक्षणातून समोर आलेले निकष पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहेत, त्यामुळे यातून एबीपी न्यूज अथवा एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी हे सर्वेक्षण केले आहे. यासाठी देशभरातील विविध राज्यातील लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. सर्वेक्षणातील त्रुटींचं मार्जिन ऑफ एरर प्लस - मायनस 3 ते प्लस - मायनस 5 टक्के इतके आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Exit Poll Result 2024 Lok Sabha Election: शिंदेंच्या शिवसेनेचे किती उमेदवार जिंकणार?; एक्झिट पोलच्या आकडेवारीतून मुख्यमंत्र्यांना 'दे धक्का'