मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काय होणार, याची उत्सुकता अनेकांना लागून राहिला आहे. या पार्श्वभूमीवर एबीपी माझा-सी व्होटरचा ओपिनियन पोल प्रसिद्ध झाला आहे. या ओपिनियन पोलनुसार राज्यात महाविकास आघाडीला (MVA Alliance) 18 जागांवर विजय मिळेल, तर महायुतीला 30 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. या ओपनियन पोलमध्ये अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. बारामती, परभणी, माढा, हातकणंगले आणि मुंबईतील जवळपास सर्व मतदारसंघांमध्ये सनसनाटी निकाल पाहायला मिळू शकतात. एबीपी माझा-सी व्होटरच्या ओपिनियन पोलमध्ये राज्यातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये (Loksabha Election 2024) सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार कोणत्या लोकसभा मतदारसंघात कोणता उमेदवार आघाडीवर आणि पिछाडीवर राहणार, याचा निष्कर्ष समोर आला आहे.

ABP Majha C voter Survey

मतदारसंघमहायुती (भाजप, शिंदे आणि अजित)महाविकास आघाडी (UBT, Shard, Cong)ओपिनियन पोलनुसार कोण आघाडीवर
नंदुरबारडॉ. हिना गावितगोवाल पाडवीगोवाल पाडवी
धुळेसुभाष भामरेडॉ. शोभा बच्छावसुभाष भामरे
जळगावस्मिता वाघकरण पवारस्मिता वाघ
रावेररक्षा खडसेश्रीराम पाटीलरक्षा खडसे
बुलडाणाप्रतापराव जाधवनरेंद्र खेडेकरनरेंद्र खेडेकर
अकोलाअनुप धोत्रेअभय पाटीलअनुप धोत्रे
अमरावतीनवनीत राणाबळवंत वानखेडेनवनीत राणा
वर्धारामदास तडसअमर काळेरामदास तडस
रामटेकराजू पारवेरश्मी बर्वेराजू पारवे
नागपूरनितीन गडकरीविकास ठाकरेनितीन गडकरी
भंडारा-गोंदियासुनील मेंढेडॉ. प्रशांत पडोळेसुनील मेंढे
गडचिरोली-चिमूरअशोक नेतेडॉ. नामदेव किरसानडॉ. नामदेव किरसान
चंद्रपूरसुधीर मुनगंटीवारप्रतिभा धानोरकरसुधीर मुनगंटीवार
यवतमाळ - वाशिमराजश्री पाटीलसंजय देशमुखसंजय देशमुख
हिंगोलीबाबूराव कदमनागेश पाटील आष्टीकरनागेश पाटील आष्टीकर
नांदेडप्रताप पाटील चिखलीकरवसंतराव बळवंतराव चव्हाणवसंतराव बळवंतराव चव्हाण
परभणीमहादेव जानकरसंजय जाधवसंजय जाधव
जालनारावसाहेब दानवेकल्याण काळेरावसाहेब दानवे
औरंगाबाद चंद्रकांत खैरेचंद्रकांत खैरे
दिंडोरीडॉ. भारती पवारभास्करराव भगरेडॉ. भारती पवार
नाशिक राजाभाई वाजेमहायुती
पालघर भारती कामडीमहायुती
भिवंडीकपिल पाटीलसुरेश म्हात्रेसुरेश म्हात्रे
कल्याणश्रीकांत शिंदेवैशाली दरेकरश्रीकांत शिंदे
ठाणे राजन विचारेमहायुती
मुंबई-उत्तरपियुष गोयलकाँग्रेसपियुष गोयल
मुंबई - उत्तर पश्चिम अमोल कीर्तीकरमहायुती
मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व)मिहीर कोटेचासंजय दिना पाटीलमिहीर कोटेचा
मुंबई उत्तर मध्य काँग्रेसमहायुती
मुंबई दक्षिण मध्यराहुल शेवाळेअनिल देसाईराहुल शेवाळे
दक्षिण मुंबई अरविंद सावंतमहायुती
रायगडसुनील तटकरेअनंत गीतेअनंत गीते
मावळश्रीरंग बारणेसंजोग वाघेरे-पाटीलश्रीरंग बारणे
पुणेमुरलीधर मोहोळरविंद्र धंगेकरमुरलीधर मोहोळ
बारामतीसुनेत्रा पवारसुप्रिया सुळेसुप्रिया सुळे
शिरुरशिवाजी आढळरावडॉ. अमोल कोल्हेडॉ. अमोल कोल्हे
अहमदनगरसुजय विखे पाटीलनिलेश लंकेनिलेश लंके
शिर्डीसदााशिव लोखंडेभाऊसाहेब वाघचौरेभाऊसाहेब वाघचौरे
बीडपंकजा मुंडेबजरंग सोनवणेपंकजा मुंडे
धाराशिवअर्चना पाटीलओमराजे निंबाळकरओमराजे निंबाळकर
लातूरसुधाकर श्रृंगारेशिवाजीराव काळगेसुधाकर श्रृंगारे
सोलापूरराम सातपुतेप्रणिती शिंदेराम सातपुते
माढारणजितसिंह नाईक निंबाळकरधैर्यशील मोहिते पाटीलधैर्यशील मोहिते पाटील
सांगलीसंजयकाका पाटीलचंद्रहार पाटीलसंजयकाका पाटील
साताराउदयनराजे भोसलेशशिकांत शिंदेशशिकांत शिंदे
रत्नागिरी-सिंधुदुर्गनारायण राणेविनायक राऊतनारायण राणे
कोल्हापूरसंजय मंडलिकशाहू महाराज छत्रपतीसंजय मंडलिक
हातकणंगलेधैर्यशील मानेसत्यजीत पाटीलसत्यजीत पाटील

आणखी वाचा

मोठी बातमी : अजित पवारांची धाकधूक वाढली, एबीपी माझाच्या ओपिनियन पोलमध्ये एकही जागा नाही!