Aaditya Thackeray on Sada Sarvankar दादर, दक्षिण मध्य मुंबई : "आज मी इथून आमदारांना (सदा सरवणकर) सांगत आहे. आमच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत तुम्ही बंदुक काढली. तुमच्यावर अतिरेक्याचा कायदा युएपीए मी टाकणार आहे. तुम्हाला सोडणार नाही. पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही फायरिंग केलंय. तु्म्ही पोलिसांवर फायरिंग केलं, तुम्हाला अतिरेक्यासारखं आतमध्ये टाकणार आहे. हा मी तुम्हाला शब्द देतोय", असा इशारा ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दादरचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांना दिला. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे ठाकरेंचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. 


ध्रुव राठींसारख्या लोकांनी याचं सगळं समोर आणलं 


आदित्य ठाकरे म्हणाले, ही निवडणूक (सदा सरवणकर)  त्यांची नाही. त्यांना महत्व द्यायचे नाही. त्यांना इशारा पुरेसा आहे. गेल्या दहा वर्षात महागाई वाढत गेली. प्रधानमंत्री आवास योजनेत कोणाला घरं मिळाली नाहीत. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख देतील असे आश्वासन दिले होते, मात्र एकाच्याही खात्यात आले नाहीत. त्यांच्या खात्यात 50 खोके आले असतील. आपल्याकडे काही 15 लाख आले नाहीत. खोटं बोला रेटून बोला, खोटं बोला रडून बोला, हे यांचे धोरण आहे. ध्रुव राठींसारख्या लोकांनी याचं सगळं समोर आणलं आहे. आपल्या व्हाट्सअॅपवर येऊ लागलं आहे.


दोन महिन्यांपूर्वी, अबकी बार 400 पारचा नारा होता


पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, दोन महिन्यांपूर्वी, अबकी बार 400 पार चा  नारा होता. मग तिथून आलं मोदी सरकार, त्यानंतर आलं भाजप सरकार, त्यानंतर आता म्हणतात एनडीए सरकार. आता आपल्याला प्रश्न विचारला जातोय की, यांचे आकडे कमी पडले तर तुम्ही यांच्यासोबत जाणार आहात का? दोन-चार मुलाखतींमध्ये मला विचारलं. मी म्हटलं महाराष्ट्र द्वेष्ट्यांशी तडजोड नाही. 


हे भाजपवाले राहिलेच नाहीत


ही भाजपा राहिलीच नाही. हुकूमशाही आणणारी भाजप आहे. वाजपेयी साहेबांची भाजपा वेगळी होती. ती आज आहे तरी कुठे? ती लोक राहिलेच नाहीत. गोपाळ शेट्टी, प्रकाश मेहता, पूनम महाजन राज पुरोहितजी कुठे आहेत? हे भाजपवाले राहिलेच नाहीत. जे आहेत ते भ्रष्टाचारी राहिलेले आहेत, असंही आदित्य ठाकरेंनी सांगितलं.  


इतर महत्वाच्या बातम्या 


इकडं जो उमेदवार उभा आहे, त्याचे व्हिडीओ फिरतायत, अशा व्यक्तीचा प्रचार करता? उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींना सवाल