Sharad Pawar on PM Narendra Modi : नरेंद्र मोदी हे पहिले असे पंतप्रधान आहे जे देशात विविध जाती धर्मामधील ऐक्य निर्माण करण्याऐवजी अंतर कसे वाढेल अशी भूमिका घेतात, असा घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर केली. आज दिंडोरीतील वणी येथे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) अधिकृत उमेदवार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांच्या प्रचारार्थ शरद पवारांची जाहीर सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, सर्वसामान्य लोकांमधील भगरे सर यांना लोकसभेत पाठवा. तुमच्या जिल्ह्यातील दोन जागा राजाभाऊ वाजे, आणि भास्कर भगरे यांना निवडून द्या ही विनंती करण्यासाठी आज इथे आलो आहे. 1980 साली या जिल्ह्यातील सगळ्या जागा आमच्या पक्षाच्या निवडून आल्या होत्या. ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे रावसाहेब थोरात यांचे आज स्मरण होते आहे. शिक्षण क्षेत्रात अतिशय महत्वाची कामगिरी त्यांनी केली. मविप्रचे संस्थापक याच गावचे आहेत ही अंत:करणात आहे.
काळ्या आईशी इमान राखणारा हा जिल्हा
लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा हा महत्वाचा आहे. आदिवासी आणि शेतकऱ्यांनी शिरूरमध्ये उत्साहाने मतदान केले. काळ्या आईशी इमान राखणारा हा जिल्हा आहे. शेतीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न या जिल्ह्यातील तरुण शेतकरी करत आहे. सह्याद्री संस्थेची आठवण होत आहे. या जिल्ह्याचा नावलौकिक अनेकांनी केला आहे. हा जिल्हा आदिवासींचा आहे. जल, जंगल या देशाची संपत्ती आहे. या तिन्ही संपत्तीचा मालक हा आदिवासी आहे.
शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका
आज देशाचे पंतप्रधान इथे आले. नेहमीप्रमाणे भाषण केले. ते भाषण मी ऐकले. नरेंद्र मोदी हे देशातील पहिले असे पंतप्रधान आहे जे देशात विविध जाती धर्मामधील ऐक्य निर्माण करण्याऐवजी अंतर कसे वाढेल अशी भूमिका घेतात. आज नाशिकच्या सभेत त्याची पुनरावृत्ती केली, अशी टीका शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.
उत्तम शिक्षक असलेले भास्कर भगरेंना निवडून द्या
या जिल्ह्यातील पाणी प्रश्न महत्वाचा आहे. जिल्ह्याला पाण्याची गरज आहे. जिल्ह्यातील पाण्याची गरज आहे. मात्र ते पाणी गुजरातला जात असेल तर राज्यातील नेतृत्व काय करते आहे. मात्र त्यांना देशावरून सूचना असतील. नाशिक जिल्ह्यावर हा अन्याय आहे. पाण्याचा विषय अभ्यासपूर्ण आहे. जलतज्ञ बोलवावे, वाहून जाणारे पाणी अडवायचे कसे या विषयी अभ्यास करावा. निवडणूक संपल्यानंतर यावर सर्वांनी आग्रह धरा. चांदवडमध्ये शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याचे हाल आहेत. अनेक तालुक्यात आज पाणी नाही. उत्तम शिक्षक असलेले भास्कर भगरे यांना निवडून द्या, असे आवाहन यावेळी शरद पवारांनी केले आहे.
आणखी वाचा