Suresh Dhas Majha Katta: संतोष देशमुख प्रकरणाला आज 3 महिने पूर्ण झाले आहेत. खंडणीपासून हत्येपर्यंत वाल्मिकची बीडमधील गँग, हत्येचा कट, आरोपींना केलेली मदत, गुंडगिरी, दहशत, संतोष देशमुख यांना झालेली मारहाण या सगळ्या प्रकरणाचा सूत्रधार असलेला वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या जवळच्या संबंधांची वारंवार चर्चा होत असते. दरम्यान, वाल्मिक कराडची आतली प्रकरणं बाहेर काढण्यात अग्रेसर असणाऱ्या सुरेश धसांनी एका गोळीबाराच्या घटनेनं वाल्मिक घरगड्याचा मालक कसा झाला हे माझा कट्ट्यावर सांगितलंय. (Suresh Dhas)
काय म्हणाले सुरेश धस?
'वाल्मिक कराड आधी फक्त घरगडी होता. गोपीनाथ मुंडे यांच्या घरी साफसफाई करायचा. पुढे मुंडे साहेबांच्या आणि टीपी मुंडेंच्या महाविद्यालयाच्या राजकारणात गोळीबार झाला. त्यातली एक गोळी वाल्मिक कराडच्या पायाला लागली. नशिबाने तो वाचला. त्याच्यानंतर वाल्मिक कराड थेट गोपीनाथरावांच्या घरातच गेला. आमच्यासाठी गोळी खाल्ली म्हणून वाल्मिकचे कौतुक झालं. तो साहेबांच्या जवळ गेला. गोपीनाथराव आणि पंडित अण्णा एकत्र होते. नंतर ते वेगळे झाले. हे दोघे वेगळे झाल्यानंतर वाल्मिक पंडितांनांकडे वळला . (Suresh Dhas)
गोपीनाथराव आणि पंडितांना तसे कधी वेगळे नव्हते .भावा भावांचं प्रचंड एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं .त्यांचं विभाजन झालं त्यावेळी वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या बाजूने राहिला .जो सुरुवातीला घरगडी होता .त्यालाच तुम्ही मालक करून टाकला .एवढा मोठा मालक केला की सगळच त्याच्यावर सोपवलं .जर एखाद्याची लायकी 100 रुपयाची असेल आणि त्याला दहा लाख रुपये दिल्यावर तो काय करणार . खायचा तू दहा लाखाचे कोटी करण्याचा प्रयत्न करणारच . धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडने ग्रिडी पॉलिटक्स केलं .गरजेपुरतं कमावलं बास केलं असं नाही . असं सुरेश धस 'माझा कट्ट्या'वर म्हणाले .
कृष्णा आंधळेचं काय झालं असेल?
कृष्णा आंधळे अजून अटक होण्यासाठी राहिलाय. कृष्णा आंधळेचा कोण कशाला खून करतंय. या प्रकरणात सगळ्यांचे रोल फिक्स आहेत. कितीही दिवस फिरला तरी पोलीस त्याला पकडतील. कृष्णा आंधळेला त्याच्या घरच्यांविषयी काही नाही. कोणाविषयी प्रेम नाही. मुकादमकी करत होता. त्याच्याकडे एक ट्रक आहे. त्याची प्रॉपर्टी जप्त करण्यात आलीय. असं सुरेश धस म्हणाले.गोळीबाराच्या एका घटनेने वाल्मिक घरगड्याचा मालक झाला, सुरेश धसांनी माझा कट्ट्यावर सांगितलं ..