Bollywood Actress Kangana Ranaut Net Worth: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिला भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी या लोकसभा मतदारसंघातून (Mandi Loksabha Election) कंगना रनौत लोकसभेची निवडणूक लढत आहे. यासाठी मतदानाच्या पहिल्या टप्प्यात मतदान पार पाडलं. त्यामुळे कंगना रनौत निवडणूकीत बाजी मारत भाजपाच्या खासदार होणार की तिला पराभवाचा सामना करावा लागणार, हे 4 जून रोजीचं स्पष्ट होणार आहे. मात्र त्याआधी कंगना रनौतची नेमकी किती संपत्ती आहे, याबाबत माहिती समोर आली आहे. 


कंगना रनौतकडे एकूण 21.50 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तिने एलआयसीच्या एकूण 50 विमा योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे. विमा योजना तिने 2008 मध्ये एकाच दिवशी खरेदी केल्या होत्या. तिच्याकडे 6 किलो सोने, 60 किलो चांदीचे दागिने आणि 3 कोटी रुपयांचे हिरे आहेत. ती बारावीपर्यंत शिकली आहे. कंगना रनौतने लोकसभेसाठी मंडी येथून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यासोबत दिलेल्या शपथपत्रातून ही माहिती समोर आली आहे.


कंगना रनौतच्या नावावर शेती नाही. मात्र, कोट्यवधी रुपये किंमतीचे आलीशान घरे व व्यावसायिक मालमत्ता आहे. मुंबई आणि मनालीमध्ये आलीशान घरे आहेत. तसेच चंडीगड, मुंबई आणि कुल्लूमध्ये व्यावसायिक मालमत्ता आहे. कंगना रनौतकडे एकूण 28.73 कोटींची स्थावर संपत्ती आहे. कंगनाला महागड्या गाड्यांचीही हौस असल्याचे समोर येत आहे. कंगनाने तिच्या प्रतिज्ञापत्रात तिच्याकडे फक्त 2 लाख रुपये रोख असल्याचे दाखवले आहे. दस्तऐवजानुसार, तिने 2022-23 या आर्थिक वर्षात 4,12,95,770 रुपये आयकर भरला आहे, जो तिने 2018-19 मध्ये भरलेल्या रकमेच्या जवळपास एक तृतीयांश आहे.


शपथपत्रात काय माहिती दिली?


-99.50 कोटी रुपयांची एकूण संपत्ती.
-4.12 कोटी रुपये गेल्या आर्थिक वर्षातील उत्पन्न.
-4 कोटी रुपये किमतीचे 6 किलो सोने.
-3 कोटी रुपयांचे हिरे.
-10-10 लाखांच्या 49 विमा योजना.
-1.20 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक.
-50 लाख रुपये किमतीची 60 किलो चांदी.
-17 कोटी रुपयांचे कर्ज कंगनावर आहे.
-8 खटले कंगनाच्याविरोधात प्रलंबित आहेत.


महागड्या गाड्यांचीही हौस


-3 लग्झरी कार आणि 1 स्कूटर कंगनाकडे आहेत.
-53 हजार रुपयांची स्कूटर.
-58 लाखांची मर्सिडीज बेंझ.
-3.91 कोटींची मर्सिडीज मेबॅक,
-98 लाखांची बीएमडब्ल्यू कार.


मंडी मतदारसंघाला विशेषत: प्रतिकात्मक महत्त्व 


दिवंगत माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या कुटुंबाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मंडी मतदारसंघाला विशेषत: प्रतिकात्मक महत्त्व आहे. दिवंगत नेत्याच्या पत्नी प्रतिभा देवी सिंह यांच्याकडे असलेल्या या जागेवर २०२१ मध्ये भाजप खासदार राम स्वरूप शर्मा यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली होती. 


कंगनाच्या लग्नाच्या देखील जोरदार चर्चा-


कंगना रनौतचा 'तेजस' (Tejas) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. अभिनेत्री सध्या 'इमरजेन्सी' या सिनेमामुळे चर्चेत आली होती. तिचा हा सिनेमाही काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.  या सिनेमात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. दरम्यान सध्या कंगनाच्या लग्नाच्या देखील जोरदार चर्चा सुरु आहेत.