PM Narendra Modi मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई व नवी मुंबईत दौऱ्यावर असून ते यावेळी विविध कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे. दरम्यान महायुतीला राज्यात मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. अशातच यावेळी पंतप्रधान मोदी हे  महायुतीच्या आमदारांशी बैठकीत संवाद साधणार आहेत. मोदी यांच्या हस्ते ‘आयएनएस सूरत’, ‘आयएनएस निलगिरी’ या युद्धनौकांचे आणि ‘आयएनएस वाघशीर’ या पाणबुडीचे सकाळी जलावतरण झाले. त्यानंतर नेवीच्या आंग्रे सभागृहात पंतप्रधान संवाद साधला असून यावेळी मोदींनी महायुतीच्या आमदारांना खास सल्ला देत मार्गदर्शन केलं आहे.


मात्र यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात राज ठाकरेंचा (Raj Thackeray)  खास उल्लेख केला आहे. राज ठाकरेंनी जसा 2011 ला गुजरात ज्याप्रमाणे गुजरात दौरा केला होता. तसेच अभ्यास दौरे इतर आमदारांनी ही केले पाहिजेत, अशी सल्लाही मोदींनी महायुतीच्या आमदारांना दिला आहे.  


राज ठाकरेंच्या गुजरात दौऱ्याचा खास उल्लेख


मोदींच्या मार्गदर्शनात आमदारांनी प्रामुख्याने लोकांमध्ये जायला हवे, विरोधकांशी ही श्रेय वादातून टिका करण्यापेक्षा कामातून उत्तर द्या.तुम्ही केलेल्या कामावर लोकांची काय मत आहेत हे जाणून घ्या,  इतर राज्यात किंवा इतर मतदारसंघाच एखादी गोष्ट चांगली असेल तर त्याबाबत अभ्यास दौरा करा, अशी शिकवणी ही पंतप्रधानांनी महायुतीच्या आमदारांना दिली आहे. मात्र यावेळी मोदींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुजरात दौर्‍यावर आले होते, त्याचं आवर्जून उदाहरण देत उपस्थित आमदारांना त्यांच्या प्रमाणे अभ्यास दौरा करण्याचा सल्ला दिला आहे. समाजासोबत,  कुटुंबालाही वेळ द्या, आपल्या कामांचा एक संकल्प करून ती काम कशी पूर्ण करता येतील याचं नियोजनही असायला हवे.असेही मोदी यावेळी म्हणाले. 


पंतप्रधान मोदी यांनी आमदाराना काय मार्गदर्शन केल?


१) महायुती म्हणून संघटन वाढवण्यावर भर द्या 


२) मतदारसंघात घटक पक्षातील आपले जे आमदार आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्या कार्यालयांना एकमेकांनी भेटी द्या 


३) महायुतीचा एकोपा वाढवायचा असेल तर गावो गावी डब्बा पार्टी आयोजन करा 


४) अनेक वर्ष काँग्रेसने सत्ता कशी टिकवली याच उदाहरण पंतप्रधान यांनी आपल्या भाषणात दिलं. एक पंचवार्षिक रस्ता करू असं आश्वासन देतात. दुसऱ्या पंचवार्षिकला नकाशा दाखवतील तिसऱ्या पंचवार्षिकला कामाची सुरुवात करण्याची घोषणा करतील


५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गुजरातमधे भाजपकडून सत्ता केंद्र कशा प्रकारे चालवल जात आहे याच उदाहरण देण्यात आलं. गुजरात मधे ग्रामपंचायती स्थानिक स्वराज्य संस्थापासून विधानसभा लोकसभा यामधे भाजपने एक हाती सत्ता कशी राखली आहे हे सांगण्यात आलं. महाराष्ट्रात देखील महायुती अशाच प्रकारे काम करेल अशी आशा व्यक्त केली


६) आमदारानी आपल्या मतदारसंघाची काळजी घेताना स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या 


७) लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आपल्याकडे सर्वाच लक्ष असतं त्यामुळे माध्यमाशी बोलताना काळजी घ्या. आपल्या हातून चुकीच्या बाबी घडणार नाहीत याकडे लक्ष द्या


हे ही वाचा